तरुण भारत

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.5 कोटींवर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.5 कोटींवर पोहचली आहे. जगात आतापर्यंत 2 कोटी 53 लाख 84 हजार 547 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 8 लाख 50 हजार 591 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

रविवारी जगभरात 2 लाख 20 हजार 670 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 4182 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 2.53 लाख बाधितांपैकी 1 कोटी 77 लाख 06 हजार 841 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 68 लाख 27 हजार 115 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 61 हजार 102 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 61 लाख 73 हजार 236 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 34 लाख 25 हजार 723 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 87 हजार 224 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 38 लाख 62 हजार 311 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 30 लाख 31 हजार 559 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 20 हजार 896 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

वीज बिलात तात्काळ सूट द्या; राज ठाकरेंचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

pradnya p

देशात गेल्या 24 तासात 1409 नवे कोरोना रुग्ण

prashant_c

1.7 कोटी एमएसएमइ शॉप बंदचे संकेत

Patil_p

महाराष्ट्रात मृत्यूतांडव! विरारच्या कोविड रुग्णालयाला भीषण आग; 13 जणांचा होरपळून मृत्यू

pradnya p

Cyclone Yaas: पीएम नरेंद्र मोदींनी घेतली आढावा बैठक

triratna

संक्रमणाच्या दुसऱया लाटेने फ्रान्स-ब्रिटन त्रस्त

Patil_p
error: Content is protected !!