तरुण भारत

3 सप्टेंबर रोजी अर्थमंत्र्याची बँका-एनबीएफसीसोबत बैठक

अर्थमंत्रालयाची माहिती : कर्जासह अन्य बाबींवर विचार शक्मय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची कर्जासह इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी बँका आणि बिगर बँकिंग फायनान्स( एनबीएफसी)  संस्था यांच्यासोबत येत्या गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोनामुळे कर्ज वितरण, कर्ज वसूली आणि कर्जाच्या पुनर्रचनेसह अन्य बदलांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. सदर बैठकीचे संकेत हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच दिले होते. त्यावेळी त्यांनी कोरोना संकटामुळे थकीत कर्जासह अन्य विषयावर 6 सप्टेंबर रोजी निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले होते. सदर बैठकीत व्यवसायांना लाभ मिळवून देणे, बँकांच्या नियमांना सक्षम बनवणे तसेच कर्जासंबंधीच्या निकषावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

Related Stories

भारतामध्ये ओप्पोकडून ई-स्टोअर लाँच

Patil_p

टेस्लाची भारतात विक्रीसाठी सबसिडीची मागणी

Patil_p

15 हजार कोटी जमवण्यासाठी ऍक्सीस बँकेला परवानगी

Patil_p

कल्याण ज्वेलर्सच्या 150 व्या शाखेचे उदघाटन

Patil_p

युपीआय आधारित डिजिटल पेमेंट विनाशुल्क?

Patil_p

संधीचा काळ; पण…

Patil_p
error: Content is protected !!