तरुण भारत

रामदुर्ग तालुक्यात नूतन शाळा खोल्यांचे भूमिपूजन

वार्ताहर/ रामदुर्ग

तालुक्मयातील तुरनूर, गोणगनूर, मल्लापूर, मागनूर, मागनूर प्लॉट येथे एकूण 223 नूतन शाळा खोल्या निर्माण करण्यात येत आहेत. यामुळे तालुक्यात शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे, असे आमदार महादेवप्पा यादवाड यांनी सांगितले. दरम्यान, तुरनूर येथे 44 लाख, गोणगनूर येथे 48 लाख, मल्लापूर येथे 22 लाख, मागनूर येथे 22 लाख व मागनूर प्लॉटमध्ये 11 लाख रुपये अनुदानामधून शाळा खोल्या कामास त्यांनी चालना दिली.

Advertisements

शिक्षकांनी वेळेचे पालन व कर्तव्यात कसूर करू नये. तसेच याकडे ग्रामस्थांनी लक्ष ठेवावे. शिक्षकांनी कर्तव्या कसूर केल्यास कठीण कारवाईचा इशाराही यादवाड यांनी दिला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता रवीकुमार, प्रभारी गटशिक्षणाधिकारी के. एन. हाकाटी, तिप्पण्णा पुजेर, बसवराज हळ्ळी, पडियप्पा पाटील, लक्ष्मण पुजेर, यमनव्वा गोडची व एसडीएमसी अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

शनिवारी 232 जणांचा अहवाल निगेटिव्ह

Patil_p

शिंदोळी ग्रामस्थांतर्फे सुवर्णसिंहासनासाठी 1 लाखाचा कर्तव्यनिधी

Amit Kulkarni

रिकामी धावतेय बेंगळूर-बेळगाव एक्स्प्रेस

Patil_p

बेळगावात घरफोडय़ा करणाऱया जोडगोळीला अटक

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक येथे गोठय़ाला आग

Amit Kulkarni

मण्णूर येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Patil_p
error: Content is protected !!