तरुण भारत

मराठी अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम खाते हॅक

प्रतिनिधी / कोल्हापूर

दूरचित्रवाहिणीवर सध्या गाजत असलेल्या एका मराठी मालिकेचे कोडोली परिसरात चित्रीकरण सुरु आहे. यातील प्रमुख अभिनेत्रीचे इन्स्ट्राग्रामचे खाते हॅक करून अज्ञाताने छेडछाड केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या या अभिनेत्रीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे. पोलीस हॅकर्सचा कसून शोध घेत आहेत.

पन्हाळा तालुक्यातील कोडोली परिसरात दोन महिन्यांपासून एका मराठी मलिकेचे चित्रीकरण सुरु आहे. या मालिकेतील एका तरुण अभिनेत्रीचे इन्स्ट्राग्राम खाते अज्ञाताने हॅक करुन त्यावर छेडछाड केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. त्यामुळे या अभिनेत्रीने कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केली. कोडोली पोलीसांनी हा अर्ज सायबर पोलीस ठाण्याकडे पाठवला असून सायबरकडून तपास सुरू झाला आहे.

या अभिनेत्रीचे इन्स्ट्राग्रामचे खाते कोणी हॅक केले. त्याव्दारे बदनामी केली आहे का ? किंवा काही चुकीचे संदेश पाठवले आहेत का ? याची माहिती पोलीस काढत आहेत. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हॅकर्सचा शोध सुरू केला आहे. कोडोली परिसरात जाऊनही पोलीस तपास करणार असल्याचे समजते. मात्र या प्रकाराची जिल्हयात दबक्या आवाजात चर्चा सुरू असून मालिकेतील अन्य कलाकारही घाबरले आहेत.

Advertisements

Related Stories

जिल्हा बँकेला 149 कोटी 22 लाख करपूर्व नफा

Patil_p

कोल्हापूर : कबनुरात कोरोनाबाधित संख्या २७ वर, आज आणखी दोघांचा बळी

Abhijeet Shinde

सिव्हीलमध्ये राडा करणाऱया तृतीयपंथियांवर गुन्हा दाखल

Patil_p

कोरोना : महाराष्ट्रात 16,429 नवे रुग्ण; 423 मृत्यू

Rohan_P

दुसाळेचा जवान लेहमध्ये हुतात्मा

Patil_p

कोल्हापुरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ; महिला डॉक्टरसह 8 जण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!