तरुण भारत

दक्षिण गोव्याचे डेप्युटी एज्युकेशन आँफिसर व्ही.बी.शिंदे आजपासून निवृत्त

वाळपई / प्रतिनिधी

दक्षिण गोव्याचे डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर श्री व्ही बी शिंदे हे दिनांक 1 सप्टेंबर पासून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या सरकारी सेवेची सुरुवात सत्तरीतील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय पासून सुरू केली. सुमारे पंधरा वर्ष त्यांनी वाळपई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात ज्ञानदानाचे कार्य केले. त्यानंतर 2001 चाली त्यांना मुख्याध्यापकपदी बढती मिळाली. फोंडा येथील विविध हायस्कूलमध्ये त्याने मुख्याध्यापक पद भूषविले. एक प्रयोगशील मुख्याध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध प्रयोग करून विद्यालयाचा दर्जा सुधारला. त्यानंतर 2004 साली त्यांना बढती मिळाली आणि ते दक्षिण गोव्या मध्ये मडगाव येथे एज्युकेशन ऑफिसर म्हणून रुजू झाले. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचीख्याती आहे. हाताखालच्या लोका मध्ये मिळून मिसळून त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून योग्य पद्धतीने काम करून घेणे आणि शिक्षणाचा विकास घडवून आणणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. ते निवृत्त होत असताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱयाची शिक्षण खात्याला कमतरता नेहमीच जाणवत राहील.

Advertisements

Related Stories

आयएसएलमध्ये केरळ ब्लास्टर्सचा ओडिशावर 2-1 गोलफरकाने विजय

Amit Kulkarni

यशवंत विद्यार्थी गावचे भूषण

Amit Kulkarni

शाळा 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार काय?

Amit Kulkarni

कोरोनामुळे पणजी मनपाचा 90 टक्के महसूल बुडाला

Patil_p

गोव्याच्या सिंदिया, करिश्मा, वॅलनी भारतीय संभाव्य फुटबॉल संघात

Amit Kulkarni

अग्निशामक दलाच्या कवायतीवेळी सोशल डिस्तस्निंगचा फज्जा

Amit Kulkarni
error: Content is protected !!