तरुण भारत

डॉ. विशाल च्यारी गुढरित्या बेपत्ता कार मुळस-पारोडा येथे सापडली

प्रतिनिधी / मडगाव

गोवा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विशाल च्यारी हे शनिवारपासून गुढरित्या बेपत्ता आहेत. ते बेपत्ता झाल्याची तक्रार ओल्ड गोवा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आलेली आहे. त्यांची कार काल सोमवारी मुळस-पारोडा येथे पार्क केलेली आढळून आली आहे. शनिवारपासून त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. सोमवारी केपे पोलिसांनी पर्वत-पारोडा येथे शोध घेतला.

Advertisements

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे, प्रा. डॉ. विशाल च्यारी हे गणेशचतुर्थीला आपल्या मुळ घरी बोरी येथे गेले होते. यावेळी घरात त्यांचे काहींसे मतभेद झाले होते. त्यानंतर ते आपल्या मेरशी येथील प्लॅटवर गेले. तेथून ते विद्यापीठातही गेले होते. मात्र, शनिवारपासून ते गुढरित्या बेपत्ता आहेत.

त्यांच्या मित्र परिवाराने त्यांचा सर्वत्र शोध घेतला. ते वापरत असलेली कार मुळस-पारोडा येथे आढळून आल्यानंतर केपे पोलिसांनी श्री चंद्रेश्वर-भूतनाथ देवस्थानच्या परिसरात तसेच पर्वत-पारोडा येथे काल सोमवारी जोरदार शोध मोहिम राबविली. यावेळी श्वान पथकाची देखील मदत घेण्यात आली. परंतु, त्यातून विशेष असे काहीच साध्य झाले नाही.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पर्वतावर जात असल्याचे स्पष्ट

च्यारी यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पर्वतावरील मंदिरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजचा आधार घेतला. त्यात प्रा. च्यारी आपली कार पार्क करून पर्वतावर जाणाऱया पायऱया चढत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, ते पर्वतावरून पुन्हा खाली आल्याचे आढळून येत नाही. आज मंगळवारी पुन्हा शोध मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती केपेचे पोलीस निरीक्षक संतोष देसाई यांनी दिली.

Related Stories

अभिनय ही क्रिया नव्हे, प्रतिक्रिया

Amit Kulkarni

किर्लोस्कर मोटरची टोयोटा अर्बन प्रुजर सादर

Patil_p

राष्ट्रीय संस्था स्वयंसेवक अभियान कार्यशाळेचे उद्घाटन

Amit Kulkarni

पेडणे येथे अपघातात नईबाग येथील वृद्धाचा मृत्यू

Patil_p

सामाजिक सर्वेक्षणासाठी काणकोणात 228 कर्मचारी

Omkar B

सोनाभाट साळगाव येथे बेकायदा शेड उभारण्याचा प्रयत्न

Omkar B
error: Content is protected !!