तरुण भारत

सांगली : निंबवडेत कोरोना मृताच्या अंत्यसंस्कारावरून गोंधळ

आटपाडी / प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील एका वृद्ध व्यक्तीचा कोरोनाने मंगळवारी उपचारासाठी नेल्यानंतर मृत्यू झाला. सदर व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार कोठे करायचे यावरून बराच वेळ गोंधळ उडाला.

निंबवडे येथे काही दिवसांपूर्वी 5 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले. त्या परिसरातील अन्य लोकांचे स्वॅब घेण्यात आले. यातील एक 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीला त्रास होत होता. त्यांना इतर त्रास होते. उपचारासाठी आधी त्यांना कोरोना टेस्ट करण्यास सांगण्यात आले. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. परंतु नातेवाईकाना तो रिपोर्ट निगेटिव्ह वाटला.

सदर व्यक्तीला उपचारासाठी आटपाडीतिला आयसीयूमध्ये दाखलकरेपर्यंत त्यांचा आटपाडीत मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार कोठे करायचे, यावरून मत मतांतरे झाले. आटपाडी ओढ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा पाहणी करण्यात आली. निंबवडे येथिल नातेवाईकानी गावीच अंत्यसंस्कार करण्याची भूमिका मांडली. त्यांनतर अखेर मृतदेह निंबवडे ला नेण्यात आला.

Related Stories

सावधान : ऑनलाइन पैसे पाठवताय .. सोशल मीडियाचे अकाऊंट होतायत हॅक

triratna

सांगली : महापुराने झालेल्या नुकसानीचे 13 हजार 515 हेक्टरचे पंचनामे पुर्ण

triratna

सांगलीत संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

triratna

सांगली : निर्बंधांबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी

triratna

सांगली : न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नका अन्यथा जशास तसे उत्तर देऊ

triratna

कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून सांगलीतील शेतकऱ्याची आत्महत्या

triratna
error: Content is protected !!