तरुण भारत

शाओमी ब्रँडच्या स्मार्टफोन्सना सर्वाधिक पसंती

मागणी वाढल्यामुळे कंपन्यांनी उत्पादन वाढविले

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

मोबाईल हॅण्डसेट निर्मिती करणारी शाओमी या चिनी कंपनीने मिळत असलेली लोकप्रियता पाहून भारतामध्ये आपल्या एमआय स्टोअर्सची संख्या वाढविण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. तसेच कंपनीचे भारतीय व्यवसायात जवळपास 15 टक्क्मयांचे योगदान असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

शाओमीने सन 2014 मध्ये भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. प्रथम कंपनी ऑनलाईन फोन्सची विक्री करत होती. त्यानंतर कंपनीने 2017 मध्ये आपल्या स्पेशल रिटेल दुकानांमध्ये एमआयने स्टोअर्स सुरु केले आहेत.  

एमआय स्टोअर्सच्या व्यतिरिक्त 75 पेक्षा अधिक एमआय होम्स आहेत. तर 45 पेक्षा अधिकचे एमआय स्टूडिओज आणि फ्रेंचायजीसह 8 हजार पेक्षा अधिक एमआय प्रिफर्ड पार्टनर्स स्टोअर्स सेवा देत आहेत. एका बाजूला चिनी उत्पादनांवर मोठय़ा प्रमाणात प्रतिबंध लावण्याचे धोरण सरकार राबवत असताना दुसऱया बाजूला चिनी कंपन्यांच्या उत्पादनांस वाढती लोकप्रियता कायम राहिली आहे.

तीन हजारावे स्टोअर

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये कंपनीने आपले 3,000 वे एमआय स्टोअर सुरु केले आहे. कंपनीने जवळपास सर्व स्टोअर्स फायद्यात असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. देशातील कानाकोपऱयात ग्राहकांच्या सेवेसाठी एमआयची स्टोअर्स  अगदी देशातील लहान लहान शहरांमध्ये उघडण्यात आली आहेत. या सर्वांना ग्राहकांची पसंती सर्वाधिक मिळत असल्याचे मत भारतीय व्यवसायाचे अधिकारी मनु जैन यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

एलजी मोबाईल उद्योगातून बाहेर

Amit Kulkarni

एमआय 10 आय आज होणार दाखल ?

Patil_p

आता गुगलचं टँगी ऍप

Omkar B

विवो व्ही 20 एसई स्मार्टफोन बाजारात

Patil_p

गॅलेक्सीचे ‘एफ-62’ मॉडेल बाजारात लाँच

Patil_p

ओप्पोचा ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन दाखल

Patil_p
error: Content is protected !!