तरुण भारत

वर्क फ्रॉम होम मोहिमेतून होतेय बचत

मुंबई :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला अधिकाधिक प्राधान्य दिले असून हाच टेंड आणखी काही महिने राहण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. दरम्यानच्या काळात वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून अनेकांच्या मासिक बचतीत 5 हजार 520 रुपयांची होत असून 1 तास 47 मिनिटे इतक्मया प्रवासाच्या वेळेचीही बचत दररोज होत आहे. यासंदर्भातले सर्वेक्षण आवफीस यांनी नुकतेच केले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील कर्मचारी वर्क फ्रॉम होम करू इच्छित आहेत. कारण त्यातून त्यांच्या जाण्यायेण्याच्या वेळेत मोठय़ा प्रमाणात बचत होत आहे. घरातून काम करण्याच्या पद्धतीमुळे अंदाजे वीस टक्के इतकी म्हणजेच 5000 ते 10000 रुपयांची बचत कर्मचाऱयांना महिन्याकाठी करता येत आहे, असेही सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यात भारतातील 7 मेट्रो शहरांमध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱया 1000 कर्मचाऱयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

55 दिवसांनंतर 4.5 कोटी दुकानांनी शटर उघडले

Patil_p

जनरल मोटर्सला प्रकल्प विकण्यास होणार विलंब?

Patil_p

कोरोमंडल 400 कोटीचा नवा प्रकल्प उभारणार

Patil_p

‘क्रिप्टोकरंसी’च्या किंमतीमध्ये मोठी घसरण

Patil_p

ऍपलच्या उत्पादनांना भारतीयांची पसंती

Patil_p

अंतिम सत्रही घसरणीसह बंद

Patil_p
error: Content is protected !!