तरुण भारत

सांगली जिल्हय़ात नवे 768 कोरोना रूग्ण,26 बळी

प्रतिनिधी / सांगली

मंगळवारी जिल्हय़ात 768 रूग्ण वाढले आहेत.  तर 331 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 26 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 24 आणि परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 519 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.

Advertisements

महापालिका क्षेत्रात 264 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात मंगळवारी नवीन 264 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 150 तर मिरज शहरात 114 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रातील   मोठय़ाप्रमाणात रॅपीड ऍण्टीजन टेस्टही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर अकरा हजारापेक्षा अधिक रूग्णांची ऍण्टीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 35 ते 40 टक्के लोक बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्या वाढत चालली आहे. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात  आजअखेर एकूण रूग्णसंख्या सहा हजार 753 झाली आहे.

ग्रामीण भागात 504 रूग्ण वाढले

 ग्रामीण भागात मंगळवारीही कोरोनाने हाहाकार सुरूच राहिला आहे. ग्रामीण भागात ही रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे.  नवीन 504 रूग्ण  आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात आठ, जत तालुक्यात 17, कडेगाव तालुक्यात 53 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 70, खानापूर तालुक्यात 38, मिरज तालुक्यात 61  रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 63, शिराळा तालुक्यात 29, तासगाव तालुक्यात विक्रमी 90 आणि वाळवा तालुक्यात 65 रूग्ण वाढले आहेत.  असे एकूण ग्रामीण भागात 504 रूग्ण वाढले आहेत.

जिल्हय़ातील  24 जणांचा मृत्यू

जिल्हय़ातील 24 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये मिरज शहरातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 59, 67, 83 , आणि 90 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.  तर 52 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुपवाड शहरात दोघांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये 41 आणि 51  वर्षीय व्यक्तीचा कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मालगाव येथील 65 वर्षीय व्यक्तीचा, तसेच शिरढोण येथील 63 वर्षीय व्यक्तीचा कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला.  शिराळा तालुक्यातील करंगळी येथील 74 वर्षीय व्यक्तीचा नांद्रे येथील 76 वर्षीय व्यक्तीच कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. इस्लामपूर येथील 60 वर्षीय महिलेचा एसडीएच इस्लामपूर येथे मृत्यू झाला. पलूस येथील 57 वर्षीय व्यक्तीचा ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील 45 वर्षीय व्यक्ती आणि कांबळेवाडी येथील 73 वर्षीय व्यक्तीचा ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला. कडेगाव तालुक्यतील खंबाळे  येथील 80 वर्षीय महिलेचा ग्रामीण रूग्णालयात मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील ऐतवडे ब्रुद्रक येथील 70 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  इनामधामणी येथील 60 वर्षीय महिलेचा श्वास हॉस्पिटल येथे. सांगली येथील 67 वर्षीय महिलेचा अदित्य हॉस्पिटल येथे. मौजे डिग्रज  येथील 69 वर्षीय व्यक्तीचा तसेच इस्लामपूर येथील 46 वर्षीय व्यक्तीचा ऍपेक्स हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. बहे येथील 59 वर्षीय व्यक्तीचा, बेंद्री येथील 61 वर्षीय व्यक्तीचा , तसेच बुधगाव येथील 74 वर्षीय  व्यक्तीचा उपचारादरम्यान भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला.  या 24 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 519 झाली आहे.

परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू

मंगळवारी परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कराड येथील 55 वर्षीय व्यक्तीचा प्रकाश हॉस्पिटल येथे तर कोल्हापूर जिल्हय़ातील हातकणंगले येथील 67 वर्षीय व्यक्तीचा श्वास हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हय़ातील 105 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.

331 जण कोरोनामुक्त

 जिल्हय़ात उपचार सुरू असणारे 331 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्णांची संख्या मोठय़ाप्रमाणात वाढत चालली आहे. त्याप्रमाणात बरे होणाऱयांचे प्रमाण आता वाढू लागले आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या सात हजार 687 झाली आहे.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती

एकूण रूग्ण    13162

बरे झालेले    7687

उपचारात      4956

मयत          519

Related Stories

अब्दुल समद शेख यांना पुरस्कार

Abhijeet Shinde

पत्रकारांना दरमहा मानधन आणि विमा संरक्षण द्या – दिनकरराव पतंगे

Abhijeet Shinde

आता संभाव्य महापूराची माहिती देणार ‘कर्ण’

Abhijeet Shinde

सांगली महानगरपालिका क्षेत्रात वाढती कोरोना रूग्णसंख्या चिंताजनक

Abhijeet Shinde

मुंबईत कार्यरत असलेल्या चिंचणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात अद्यापही ७ हजार ९०५ कुटुंबे स्थलांतरित : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!