तरुण भारत

महिला पोलीस अधिकाऱयाकडे दहशतवादविरोधी मोहिमांचे नेतृत्व

चारु सिन्हा यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफची धुरा पहिल्यांदाच महिला पोलीस अधिकाऱयाच्या हाती सोपविण्यात आली आहे. चारु सिन्हा यांना तेथे पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी त्या याच पदावर जम्मू सीआरपीएफमध्ये तैनात होत्या.

1996 च्या तुकडीच्या तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी असलेल्या चारु सिन्हा यांना यापूर्वीही अवघड मानल्या जाणाऱया जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. बिहार सेक्टरमध्ये त्यांनी सीआरपीएफचे नेतृत्व केले आहे. बिहारमधील नक्षलविरोधी मोहिमांचे नेतृत्व त्यांनी केले होते.

जम्मूत यशस्वी कार्यकाळ

बिहारनंतर पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांची बदली जम्मू सीआरपीएफ मध्ये करण्यात आली होती. तेथे त्यांनी दीर्घ आणि यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांची बदली श्रीनगरमध्ये करण्यात आल्याचा आदेश सोमवारी काढण्यात आला. श्रीनगर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सीआरपीएफ सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून काम करते. सिन्हा याच भागात सर्व मोहिमांचे नेतृत्व करणार आहेत.

Related Stories

दिल्लीत डिझेलच्या दरात 8 रुपये 36 पैशांची घट; केजरीवाल सरकारचा दिलासा

pradnya p

सोनियांच्या याचिकेवर 17 मार्चला सुनावणी

Patil_p

स्टेट बँकेची ठेवींवरील व्याजदरात कपात

Patil_p

आसाममधील अग्नितांडवात अग्निशमन दलाचे जवान आणि माजी फुटबॉलपटू दुर्लोव गोगोई यांचा मृत्यू

pradnya p

दारूविक्रीसाठी तामिळनाडू सरकार सुप्रीम कोर्टात

Patil_p

10 नूतन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान

Patil_p
error: Content is protected !!