तरुण भारत

कर्नाटक आमदाराच्या गाडीतून गोव्यात ड्रग्ज तस्करी

गौरव आर्याचे आमदारासह-पोलीस कनेक्शन उघड : कर्नाटकातील पोलीस अधिकाऱयाची मदत  : ‘त्या’ आमदाराला लवकरच समन्स

प्रतिनिधी/ मुंबई

Advertisements

बॉलिवुड अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाचे धागेदोरे हे ड्रग्ज तस्करापर्यंत येऊन पोहचले असून, याप्रकरणी सलग दुसऱया दिवशी चौकशी सुरू असलेल्या गौरव आर्याचे कर्नाटक आमदारच नाही तर कर्नाटक पोलिसांशी देखील कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. याबाबत गौरव आर्याने काही संशयास्पद मा]िहती दिली आहे, मात्र याबाबत तो सहकार्य करीत नसल्याची माहिती ईडीतील अधिकृत सूत्रांनी दिली.

गौरव आर्याची सोमवारी नऊ तास चौकशी केल्यानंतर त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला आहे. यामुळे केंद्रीय अमलीपदार्थ ]िवभागाचे प्रमुख राकेश आस्थापना हे तत्काळ मुंबईला रवाना झाले आहेत. गौरव आर्याच्या गोवा येथील द टर]िमण्ड हॉटेलमध्ये तसेच दुबईतील अवैध मालमत्तेत भागीदारी असलेल्या कर्नाटक आमदाराचे गौरव आर्याशी ड्रग्ज कनेक्शन असल्याचे देखील समोर आले आहे. एवढेच नाही तर, कर्नाटकातील एक व]िरष्ठ पोलीस अधिकारी देखील या दोघांना मदत करीत असल्याचे समोर आले आहे. दुबईतून येणाऱया ड्रग्जचे कंटेनर हे कस्टम तसेच कोस्टगार्डने पकडले जाऊ नये, यासाठी ते कर्नाटकात आणले जात. त्यानंतर तेथून कर्नाटकातील आमदाराच्या गाडीतून हे ड्रग्ज गोवा येथे हलविण्यात येत असे. तर कर्नाटक-गोवा सीमेवर या पोलीस अधिकाऱयाच्या मदतीने हे गोवा येथील एका बडय़ा व्यक्तीच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर आल्याने, एकच खळबळ माजली आहे.

मुंबई-कर्नाटक-गोवा येथील ड्रग्ज जाळण्याचे प्रकार

गौरव आर्याला चौकशीसाठी बोलविताच, दुसरीकडे गौरव आर्याने मुंबई, गोवा आणि कर्नाटकातील तस्करांना पुरविलेले ड्रग्ज जाळण्यास सुरुवात केली आहे. तर अनेक ठिकाणी ते पाणी आणि सांडपाण्याच्या गटारात फेकून दिल्याचे समजते. सुशांतसिंग घेत असलेले ड्रग्ज हे गौरव आर्यानेच रियाला पुरविल्याचे समोर आले आहे.

एकाचवेळी सर्वांची सीबीआय चौकशी

दुसरीकडे सीबीआयने मंगळवारी पुन्हा रिया, तिचे आई-वडील, निरव, केशव, दीपेश सावंत आणि सिद्धार्थ पिठाणी यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत चौकशीतून अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला आहे.

रियाची मीडियाविरोधात तक्रार

सुशांतसिंह राजपूत मफत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीने मीडियाविरोधात तिच्या राहत्या घराच्या परिसरात गोंधळ घातल्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रियाने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यामध्ये ती म्हणाली की, मीडियाने माझ्या मार्गात येऊ नये आणि माझे घटनात्मक अधिकार लक्षात घेऊन काम करावे.

गोवा येथील पार्टी
तसेच फेस्टीव्हलमध्ये ड्रग्जचा पुरवठा

दरम्यान, गोवा येथे असलेल्या फेस्टीव्हल आणि पार्टींजमध्ये गौरव आर्याच्या साहय़ाने ड्रग्ज पुरविले जाते. केवळ गोव्यातच नाही तर संपूर्ण बॉलिवुडमध्ये गौरव आर्या ड्रग्ज पुरवित असून, यामध्ये मिळणारे कमिशन हे कर्नाटक आमदार तसेच कर्नाटकातील या पोलीस अधिकाऱयाला देत असल्याचे समोर आले आहे. यामुळे आवश्यकता भासल्यास ईडी या आमदाराला चौकशीसाठी समन्स पाठवू शकते.

Related Stories

पुणे व्यापारी महासंघ लॉक डाऊन संदर्भात सहकार्य करणार

Rohan_P

Anil Deshmukh case: ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत- शरद पवार

Abhijeet Shinde

युजीसी-नेट चे नवीन वेळापत्रक जाहीर

Abhijeet Shinde

जम्मू काश्मीर : गंदरबलमध्ये अतिवृष्टी, ढगफुटीने उडाला हाहाकार

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण: १६ जूनपासून राज्यात आंदोलन : खासदार संभाजीराजे

Abhijeet Shinde

”जेवढे प्रयत्न सरकार पाडण्यासाठी करताय तेवढे राज्याच्या हितासाठी करा”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!