तरुण भारत

ओसाका, जोकोविच दुसऱया फेरीत

अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस : व्हेरेव्ह, सित्सिपस, शॅपोव्हॅलोव्ह, प्लिस्कोव्हा यांचेही विजय

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisements

सोमवारपासून सुरू झालेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच व जपानची नाओमी ओसाका यांनी दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. अमेरिकेच्या 16 वर्षीय कोको गॉफचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. याशिवाय अलेक्झांडर व्हेरेव्ह, सित्सिपस, शॅपोव्हॅलोव्ह, कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनीही दुसरी फेरी गाठली आहे.

कोरोना महामारीच्या कारणास्तव ही स्पर्धा प्रेक्षकांविना खेळविण्यात येत आहे. 18 वे ग्रँडस्लॅम मिळविण्याच्या मार्गावर असणाऱया जोकोविचने बोस्निया-हर्जेगोविनाच्या दामिर झुमुरचा 6-1, 6-4, 6-1 असा सहज पराभव करीत दुसरी फेरी गाठली. विद्यमान विजेता नदाल व स्विसचा फेडरर यांच्या गैरहजेरीत जोकोविचला जेतेपदाची चांगली संधी आहे. त्याची पुढील लढत ब्रिटनच्या काईल एडमंडशी होईल. पाचव्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हला दुसरी फेरी गाठताना मात्र संघर्ष करावा लागला. सुमारे तीन तासाच्या लढतीत त्याने केविन अँडरसनवर 7-6 (7-2), 5-7, 6-3, 7-5 अशी मात केली. चौथ्या मानांकित स्टेफानोस सित्सिपसने स्पेनच्या अल्बर्ट रॅमोस विनोलसचा 6-2, 6-1, 6-1, मॅक्झिम क्रेसीने स्लोव्हाकियाच्या जोसेफ कोवालिकचा 6-1, 2-6, 6-4, 6-4, बाराव्या मानांकित डेनिस शॅपोव्हॅलोव्हने सेबॅस्टियन कोर्दाचा 6-4, 4-6, 6-3, 6-2 असा पराभव केला तर फ्रान्सच्या गिलेस सायमननेही दुसरी फेरी गाठली.

महिलांमध्ये चौथ्या मानांकित जपानच्या ओसाकाने आपल्याच देशाच्या मिसाकी दोईवर 6-2, 5-7, 6-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. अन्य सामन्यात कोको गॉफला लॅटव्हियाच्या ऍनास्तेसिया सेवास्तोव्हाकडून 6-3, 5-7, 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला तर अग्रमानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने ऍनहेलिना कॅलिनिनाचा 6-4, 6-0 असा धुव्वा उडवित आगेकूच केली.

Related Stories

रिअल माद्रिदचे प्रशिक्षक झिदान कोरोनाबाधित

Patil_p

युवराज सिंगचे सलग 4 षटकार

Patil_p

नापोलीकडे इटालियन चषक

Patil_p

शिखर धवनचे 57 चेंडूत झंझावाती शतक

Patil_p

यू-19 विश्वचषक : भारत-जपान लढत आज

Patil_p

भारताची अनहात सिंग अंतिम फेरीत

Patil_p
error: Content is protected !!