तरुण भारत

गणपती बाप्पा मोरया…कोरोनाचे संकट दूर करा!

निरोपावेळी गणेशभक्तांची एकच मागणी, ना डॉल्बी, ना मिरवणूक, ढोल-ताशांचा गजरही नाही

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

आपल्या लाडक्या बाप्पावर अतोनात प्रेम करणाऱया बेळगावकरांनी मंगळवारी जडअंत:करणाने निरोप दिला. गेले दहा दिवस भाविकांकडून होणाऱया आदरातिथ्याचा आणि पाहुणचाराचा लाभ घेऊन मंगळवारी बाप्पांनी निरोप घेतला. ‘चैन पडेना आम्हाला’ अशीच भक्तांची अवस्था झाली होती. यावषी कोरोनाच्या महामारीमुळे अत्यंत साध्या पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले. निरोप घेता आम्हा आता आज्ञा असावी, असे म्हणत बेळगावच्या गणेशभक्तांनी निरोप घेतला.

यावषी पहिला विसर्जित होण्याचा मान भातकांडे गल्ली यांनी सकाळी 11 वाजता मिळविला. त्यानंतर एसपीएम रोड-आठल्ये गल्ली तर सालाबादप्रमाणे मानाचा गणपती म्हणून परिचित असणाऱया संयुक्त महाराष्ट्र चौक येथील गणेशमूर्तीचे विसर्जन 11.30 वाजता झाले. कुलकर्णी गल्ली, बँक ऑफ इंडिया कॉर्नर-शहापूर, पांगुळ गल्ली, मराठा गल्ली-महाद्वार रोड, केळकर बाग, व्यापारी बंधू हंस टॉकीज रोड, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पांगुळ गल्ली आदी मंडळांनी कपिलेश्वर तलावात विसर्जन केले.

जक्कीनहोंड येथे पापामळा येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्ती विसर्जनाने सुरुवात झाली. मंगाईनगर-दुसरा क्रॉस-वडगाव, सेंट ऍंथोनी स्ट्रीट कॅम्प, खानापूर रोड कॅम्प, दाणे गल्ली यासह इतर मंडळांनी या तलावात विसर्जन केले. जक्कीनहोंड येथे सार्वजनिक गणेशमूर्तींपेक्षा घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाला गर्दी जास्त होती. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 32 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन

बेळगावमधील सर्वच विसर्जन तलावांवर सकाळपासून सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. दुचाकी, चारचाकी, रिक्षामधून घरगुती गणेशमूर्ती विसर्जन तलावांवर दाखल होत होत्या. काहींनी तर गल्लीतील एकत्रित गणेशमूर्ती ट्रक्टर, ट्रकमधून आणल्या. दुपारपर्यंत बऱयाच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशमूर्तींचे सायंकाळी उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते.

 अत्यंत साध्या पद्धतीने श्री विसर्जन मिरवणूक सुरू होती. 1905 साली झेंडा चौक मार्केटमध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या हस्ते बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. बेळगावातील या उत्सवाच्या वाटचालीत आज शहर व उपनगरात तब्बल 370 हून अधिक मंडळे कार्यरत आहेत. यामुळे तितक्याच ऐतिहासिक स्वरुपात आणि पारंपरिकता जपत यंदाचा गणेशोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा झाला.

गणरायाचे विसर्जन अतिशय शांततेने करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. महामंडळांची बैठक घेऊन संबंधितांना सूचनाही केल्या होत्या. त्याच अनुषंगाने बाप्पांना निरोप देण्यात आला. सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा हा उत्सव शहराची एक परंपराच बनला आहे. मात्र यावषी कोरोना महामारीमुळे अनेकांनी हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. विसर्जन मिरवणुकीला बंदी असल्याने सर्व मंडळांनी आपापली श्रीमूर्ती साध्या पद्धतीने व भक्तीमय वातावरणात विसर्जित केली.

यावषी कोरोनामुळे काहीसे विरजन या उत्सवावर दिसून आले. सर्व भक्तांनी गणरायांकडे एकच मागणी केली. कोरोनाचे संकट जावू दे आणि तुझ्या नामांचा जयघोष होवू, असे असेते मागणे असावे. जोवर चंद्र, सुर्य आहेत तोवर हा उत्सव असाच सुरु राहणार ठेवू, त्यासाठी शक्ती दे, अशी मागणीही भाविक करताना दिसत होते. दरम्यान अतिशय शांततापूर्ण वातावरणात हा उत्सव साजरा  करण्यात आला.

नारळ वाढविण्याची प्रथा खंडित पडली

सालाबादप्रमाणे मानाच्या श्रीमूर्तीचे पूजन संयुक्त महाराष्ट्र चौकात करण्यात येते. या गणपतीपाठोपाठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्ती हुतात्मा चौक येथे दाखल होतात. मानाच्या गणपतीचे पूजन व मिरवणुकीसमोर 101 नारळ वाढविण्यात येतात. मात्र यावषी कोरोनामुळे ही प्रथा खंडित पडली आहे. गणेश विसर्जनासाठी सर्व मंडळांनी आपापल्या श्रीमूर्ती घाईगडबडीत विसर्जित करून गणरायांचा निरोप घेतला.

अधिकाऱयांची वारंवार पाहणी

बेळगाव शहर व उपनगरांतील श्री विसर्जन अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आले. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कपिलेश्वर तलाव, जक्कीनहोंडा तलावावर अधिकारी वारंवार भेटी देऊन पाहणी करत होते. विसर्जन करताना कार्यकर्त्यांनाही त्रास होवू नये, याची दखल महानगरपालिकेने घेतली होती. कपिलेश्वर तलावाला पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, महानगरपालिका आयुक्त जगदीश के. एच., मनपाच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह आदी अधिकाऱयांनी भेट दिली. सायंकाळच्या सुमारास होणारी गर्दी टाळण्यासाठी मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी व त्यांच्या सहकाऱयांनी प्रयत्न केले.

पाच ते दहा कार्यकर्त्यांना प्रवेश

कोरोनामुळे सर्वच नागरिक हैराण आणि भीतीच्या छायेखाली आहेत. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी सर्व ती खबरदारी घेण्यात आली. श्रीमूर्ती विसर्जित करण्यासाठी जक्कीनहोंड, कपिलेश्वर किंवा इतर सार्वजनिक तलावांमध्ये केवळ 5 ते 10 कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे नियमांचे पालन होत असल्याचे चित्र दिसून आले.

गुलालाच्या उधळणीत खासबागच्या राजाला निरोप

यावर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यासाठी अनेक मंडळांनी प्रयत्न केले आहेत. प्रसिद्ध खासबागच्या राजाची मिरवणूकही अशीच धार्मिक पद्धतीने काढण्यात आली. फटाक्मयांची आतषबाजी अथवा झांजपथक किंवा ढोल-ताशाचा आवाज न करता गुलालाच्या उधळणीत निरोप देण्यात आला.

पोलिसांनी केली वाहने जप्त

कपिलेश्वर मंदिर परिसरात वाहनांची गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. मात्र काहींनी या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी टोईंग वाहनांतून दुचाकी वाहने जप्त केली. यामुळे काही प्रमाणात या ठिकाणची गर्दी कमी झाली. या ठिकाणी वाहने उभी करू नये, असे पोलीस वारंवार सांगत होते. तसेच गर्दी करू नये, असे आवाहनही करत होते.

जक्कीनहोंड येथे घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी सकाळी 9 वाजल्यापासून तुरळक गर्दी दिसून आली. दुपारनंतर या ठिकाणी गर्दी वाढली होती. सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी नव्या कपिलेश्वर तलावावर दोन पेन तर जुन्या तलावावर एक पेन उपलब्ध केली होती. जक्कीनहोंड येथे 2 पेन उपलब्ध होत्या. याचबरोबर प्रत्येक विसर्जन तलावावर मनपाने कर्मचाऱयांची नेमणूक केली होती. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी आरोग्य निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. सकाळपासून हे निरीक्षक जमा होणारे निर्माल्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होते.

वडगाव, नाझर कॅम्प येथील विसर्जन तलाव बंद असल्यामुळे परिसरातील गणेशभक्तांची विसर्जनासाठी तारांबळ उडाली. काही गणेशभक्तांनी आपल्या घरगुती गणेशमूर्ती जुने बेळगाव, अनगोळ तर काहींनी जक्कीनहोंड येथे विसर्जित केल्या. याचबरोबर महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या वाहनांमध्येही वडगाव परिसरात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते.

स्पिकरवरही घातले निर्बंध काही मंडळांनी ट्रक्टर ट्रॉलीतून गणेशमूर्ती नेताना स्पिकर लावले होते. या दरम्यान पोलीस प्रशासनाने त्यांचे स्पिकरही बंद केले. त्यामुळे गणेशभक्तांची काही प्रमाणात निराशा झाली.

Related Stories

खानापूर तालुक्यात शिवजयंती साधेपणाने साजरी

Omkar B

डॉक्टरांचे आंदोलन मागे, कोरोना रुग्णांची नोंद सुरु

Patil_p

हुक्केरी गुरुशांतेश्वर मठाकडून रुग्णवाहिका प्रशासनाकडे सुपूद

Amit Kulkarni

आजी-नातवावर काळाचा घाला

Amit Kulkarni

कोरोना योद्धय़ांना अनगोळमध्ये लसीकरण

Amit Kulkarni

शेतकरी – दलित कुटुंबांवर होणारा अन्याय थांबवण्याची मागणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!