तरुण भारत

इंडस्ट्रीयल ऑक्सिजन दुय्यम करून हॉस्पिटला प्राधान्य द्या : खा. संजय पाटील

प्रतिनिधी / विटा

कोरोनाच्या संकटात सध्या ऑक्सिजनची कमतरता ही मोठी समस्या आहे. माझ्यासह आमदार अनिल बाबर आणि काही डॉक्टर यांनी जिल्ह्याच्या एजन्सीशी बोलणी केली. शासकीय पातळीवर सूचना दिल्या आहेत. इंडस्ट्रीयल पुरवठा दुय्यम करून हॉस्पिटलमध्ये प्राधान्याने ऑक्सिजन देण्याबाबत चर्चा झाली आहे. तासगवच्या धर्तीवर विट्यात देखील खाजगी डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हायफ्लो ऑक्सिजन मशीन देण्यात आले. त्याचे वितरण खासदार पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार पाटील बोलत होते. आमदार अनिल बाबर, मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अमोल बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील, माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, फार्मसी कौन्सिल अध्यक्ष विजय पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष रवीअण्णा देशमुख, डॉ. अलोक नरदे उपस्थित होते.

खासदार संजयकाका म्हणाले, गेल्या दोन दिवसांपूर्वी विटा बचाव कोरोना समितीने बैठक घेतली. यावेळी काही उपाय योजना सांगितल्या होत्या. त्यामध्ये हाय फ्लो ऑक्सिजन मशीनची गरज होती. मी देखील जवळपास 28 मशीनची ऑर्डर दिली आहे. त्यातील मशीन देखील विट्याला देणार आहे. विट्याचा राजा मंडळाने रुग्णाची गरज ओळखून चांगले काम केले आहे. यातून लोकांचे जीव वाचणार आहेत.
मशीन मिळाली तरी, लागणारा ऑक्सिजन उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी मी स्वतः काल जिल्ह्याच्या एजन्सीला बोललो. आमदार अनिलभाऊ कराडच्या डीलरशी बोलले आहेत. ज्या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन तयार होतो तिथेही संपर्क साधला आहे. इंडस्ट्रीत ऑक्सिजन देण्यापूर्वी प्राधान्याने हॉस्पिटलमध्ये पुरवठा करावा, यासाठी शासकीय पातळीवर बोलणे होऊन सूचना देण्यात आल्या आहेत,

अशी माहिती खासदार पाटील यांनी दिली.

सध्याचे संकट गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. खासगी डॉक्टर धाडसाने पुढे येत आहेत. शासकीय ऑर्डर असेल तर त्यांना विम्याचे संरक्षण मिळते. ही मंडळी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही खासदार पाटील म्हणाले.

पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. मुंबईतील काही स्टाफ आणि मशिन्स जिल्ह्यात यावेत यासाठी त्यांचे काम सुरु आहे. लवकरच तिकडूनही मदत येईल. परिस्थिती गंभीर आहे. सर्वांनी मदतीची भूमिका घेऊन लोकांना दिलासा देण्याची गरज आहे, असेही खासदार पाटील म्हणाले.

यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, मंडळाचे उपाध्यक्ष पप्पू दाजी कदम, सौरभ रोकडे, नंदकुमार पाटील, सुरेश पाटील, महेश घोरपडे, शिवसेना शहराध्यक्ष राजू जाधव, दिलीप किर्दत, प्रकाश बागल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

सातारा : शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांनी केली कोरोना चाचणी

datta jadhav

नॅशनल चिकन सेंटरमध्ये नोकराने मारला डल्ला

Patil_p

सातारा : प्रतापसिंहनगरात तलवार हल्ला करणाऱ्या दोघांना अटक

datta jadhav

कल्याणी शाळेनजीक कोरोनाबाधित युवकाची आत्महत्या

datta jadhav

सातारा तालिम संघासाठी भरीव निधीची तरतूद करणार : मंत्री शंभूराज देसाई

triratna

सातारा : शिक्षकांच्या समुपदेशनाने जिल्हाअंतर्गत विनंती बदल्या होणार

triratna
error: Content is protected !!