तरुण भारत

शिवसेना नेत्याची गोळय़ा घालून हत्या

मध्यप्रदेशातील घटना : हल्ल्यात पत्नी-मुलगीही जखमी

भोपाळ :

मध्यप्रदेशातील शिवसेनेचे नेते रमेश साहू यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या हल्ल्यानंतर आरोपींनी पोबारा केला असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके नियुक्त करण्यात आली आहेत. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात साहू यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे. साहू हे 10 वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेचे मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्ष होते.  

इंदौरमधील तेजाजी शहर पोलीस ठाणे हद्दीत उमरीखेडा येथे शिवसेनेचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष असलेल्या रमेश साहू यांचा ढाबा आहे. या ढाब्यावरच साहू यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते जागीच गतप्राण झाले. तर त्यांना वाचवण्यासाठी आलेली त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे. सकाळी ढाब्यावरील कर्मचारी आत गेल्यानंतर ही घटना समोर आली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास घडली असावी असा कयास व्यक्त करण्यात आला.

Related Stories

हिमालयात संकट निर्माण करू नका !

Patil_p

लसनिर्मितीचे 4 प्रकार

Patil_p

जम्मू काश्मीर : अवंतीपोरामध्ये सुरक्षा जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक ठार

pradnya p

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर

datta jadhav

हैदराबाद मनपा त्रिशंकू;एमआयएम किंगमेकर

Patil_p

भाजप खासदार दिल्लीत आढळले मृतावस्थेत

Patil_p
error: Content is protected !!