तरुण भारत

सीआरझेडच्या वावटळीत सापडला गुहागरचा पर्यटन विकास

पर्यटनाला लागलेय दृष्ट, सुमद्रकिनारचे सौंदर्य वाढवणारे वैभव लयाला

प्रशांत चव्हाण/ गुहागर

Advertisements

गुहागर समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या सी ह्यू गॅलरी, जेटी, सेल्फी पॉईंटसारख्या बांधकामांवर हरिद लवादाच्या दणक्याने हातोडे पडत असतानाच त्यात भर म्हणून आता ज्या पर्यटनाच्या जीवावर ज्यांनी हॉटेल्स, रिसॉर्ट उभारली त्यांच्या व्यवसायावरही आता गदा आलेली आहे. यामुळे गुहागरचा पर्यटन विकास सीआरझेडच्या वावटळीत सापडल्याचे दिसत आहे.

  अगोदरच गुहागर-विजापूर महामार्ग रुंदीकरणात दळणवळणाचा उडालेला बोजवारा, पर्यटन विकासाकडे जाणारा व रखडलेला मोडकाघर पूल, पाच महिने लॉकडाऊनमुळे येथील पर्यटन व्यवसायावर आलेली अवकळा आणि आता सुरु झालेल्या या नव्या कारवाईमुळे गुहागरच्या पर्यटनाला जणू दृष्टच लागलेली दिसून येत आहे. तालुक्याचा पर्यटनदृष्टय़ा विकास व्हावा, येथील पर्यटन वाढावे, त्यांच्यासाठी समुद्रकिनारी सोयी-सुविधा व्हाव्यात यासाठी येथे विविधप्रकारची बांधकामे करण्यात आली. सी ह्यू गॅलरी, जेटी, सेल्फी पॉईंटसारखी बांधकामे येथे येणाऱया पर्यटकांना आकर्षित करायची. जेटीवर जाऊन समुद्रलाटांशी खेळणे हा पर्यटकांचा आवडता छंद, तर सेल्फी पॉईंट, सी ह्यू गॅलरी ही प्रेमीयुगुलांची हक्काची ठिकाणे नेहमीच गजबजलेली असायची. समुद्रकिनारच्या सुरुबनात लहान-मोठय़ा टपऱयांनी आपला संसार थाटला आणि येथील किनायाचे सौंदर्य वाढवले हे जरी खरे असले तरी येथे दिवसेंदिवस वाढत जाणारी बांधकामे सुरुबन नष्ट करण्यासही कारणीभूत ठरली. वादळी वाऱयांमध्ये सुरुबनाची पडझडही तितकीच कारणीभूत ठरली. एकीकडे सुरुबनाची अशी अवस्था असताना पर्यटकांना निदान चौपाटीवर उभारण्यात आलेल्या जेटी, सेल्फी पॉईंट, सी ह्यू गॅलरीच्या माध्यमातून आनंद लुटता येत होता. मात्र आता याही वैभवावर हातोड़े पडल्याने समुद्रकिनारा एकप्रकारे विद्रुपच झालेला दिसून येत आहे.

  एकीकडे पर्यटन व पर्यटकवाढीसाठी प्रयत्न होत असताना गुहागरमध्ये अलिकडे हॉटेल्स, रिसॉर्टही वाढू लागले. गुहागरचा प्रमुख व्यवसाय हा पर्यटनावरच अवलंबून आहे. येथील लहान-मोठे हॉटेल, लॉज व्यावसायिक यांची गुजराण या पर्यटन व्यवसायावरच आहे. येथील प्रसिध्द देवस्थळे ही नेहमी पर्यटकांनीच गजबजलेली असतात. त्यामुळे येथील व्यवसाय आता कुठे बाळसे धरत असतानाच तो गेल्या काही महिन्यांत दृष्टचक्रात सापडला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनने येथील पर्यटन व्यवसाय हिरावून घेतलाय. मात्रसीआरझेडच्या नियमावलीची टांगती तलवार येथील पर्यटनरुपी व्यवसायावर आहे. 

  गुहागरच्या पर्यटन मार्गाकडे जाणारे रस्ते बरोबर नाहीत, अशीही ओरड नेहमीच व्हायची. त्यामुळे विजापूर-गुहागर मार्गानेही कात टाकून रुंदीकरणाचा मार्ग पत्करला. असे असले तरी गेले वर्षभर गुहागरच्या पर्यटन विकासाचा मार्गच कठीण बनला आहे. अजूनही शृंगारतळीच्या पुढे गुहागरकडे जाणारे महामार्ग रुंदीकरणाचे काम रखडलेलेच आहे. गुहागरच्या दळणवळणाच्यादृष्टीने महत्त्वाचा ठरलेला मोडकाघर पूल तर गेले वर्षभर वाहतुकीसाठी बंद होताच, शिवाय आता त्याची दुरुस्ती सुरु असून तो उभारणीसाठी वर्ष लागणार आहे. या पुलावरून गेले वर्षभर जे काही राजकारण घडले ते गुहागरच्या सुसंस्कृतपणाला शोभणारेच नव्हते. या सर्व कारणांमध्ये गेले वर्षभर गुहागरचे पर्यटन या ना त्या कारणाने गटांगळ्याच खाताना दिसून येत आहे. 

गुहागरवासियांच्या नशिबी वादळी वारेच

  गुहागरच्या नागरिकांनी आजपर्यंत आलेली अनेक वादळे-वारे अनुभवली, अंगावर झेललीही. त्यामध्ये सर्वकाही उद्ध्वस्तही झाले. मात्र तितक्याच ताकदीने येथील नागरिक, व्यावसायिक उभेही राहिले. मात्र पर्यटन विकास व व्यवसायावर आलेल्या या वावटळीला त्यांना आता सामोरे जावे लागत आहे. गेले वर्षभर ही वावटळ ते अनुभवत आहेत. गेले पाच महिने लॉकडाऊनचा गुहागरच्या पर्यटनाला बसलेला फटका व लहान-मोठय़ा व्यावसायिकांवर आलेली बेकारीची कुऱहाड, गुहागरचे रखडलेले दळणवळण, समुद्रकिनारचे नष्ट होणारे वैभव, पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले व सध्या सीआरझेडच्या कचाटय़ात सापडलेले व्यवसाय आदी कारणांच्या दुष्टचक्रात सापडलेले पर्यटन विकासाचे हे जहाज समुद्रात हेलकावे खाताना त्यांना पहावे लागत आहे. 

Related Stories

रत्नागिरी : राजापूर शहरात धाडसी दरोडा ,लाखोंचा ऐवज लंपास

Abhijeet Shinde

कोकण मार्गावर 6 गणपती स्पेशलना मुदतवाढ

Patil_p

कोरोनामुळे राजापूर नगर परिषदेच्या 15 कोटींच्या कामांना खीळ

Patil_p

क्वारटाईन असणाऱया व्यक्तीवर गुन्हा

Patil_p

12 डिसेंबर 1965 रोजी गोळी आर-पार गेली, पण…

NIKHIL_N

तोंड उघडले तर बंगेंचे वस्त्रहरण होईल!

NIKHIL_N
error: Content is protected !!