तरुण भारत

सी आर पी एफ जवानांचा शॉक लागून मृत्यू: रणसिंगवाडी येथील घटना

वार्ताहर / पुसेगाव

 पुसेगाव पोलीस ठाणे च्या हद्दीतील रणसिंगवाडी ता खटाव येथील गोपीचंद दत्तात्रय रणसिंग वय 51 वर्षे  हे शेतातील इलेक्ट्रिक मोटर चालू करणेस गेले असता शॉक लागून मयत झाले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गोपीचंद रणसिंग हे  सी आर पी एफ मध्ये जम्मू काश्मीर पुलवामा येथे कर्त्यव्यावर होते ,ते गेले दीड महिन्यापासून रजेवर रणसिंगवाडी ता.खटाव येथे आलेले होते .मंगळवारी ,दि 1 रोजी गणपती विसर्जन करून बुधवारी कांदा लागण  असल्याने ते  मळवी  नावाच्या शिवारातील शेतात टाकलेल कांद्याचे रोप  भिजवण्यासाठी विहिरी वरील 

Advertisements

इलेक्ट्रिक मोटर चालू करणेस गेले असता शॉक लागुन बेशुद्ध झाले,त्यांचा मुलगा अजित याने  जवळपास असले ल्या लोकांच्या मदतीने त्यांना उपचारा साठी तातडीने पुसेगाव येथील प्राथमिक  आरोग्य केंद्र येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी आदित्य गुजर यांनी तपासून ते मयत झालेचे सांगितले.  त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली,एक मुलगा,सून नातवंडे व आई वडील असा परिवार आहे.आकस्मित मृत्यू नोंद करण्यात आले असून पोलीस नाईक सचिन माने अधिक तपास करत आहेत.

Related Stories

जिजाबाआण्णा जाधव यांनी समाजाला दिशा दिली

Patil_p

सातारा जिल्ह्यातील १९९ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित तर ४ बाधितांचा मृत्यू

Abhijeet Shinde

तब्बल १०० वर्षानंतर पुन्हा एका कीटक प्रजातीचा शोध

Abhijeet Shinde

मुंबई होणार आता भिकारीमुक्त! मुंबई पोलिसांनी सुरू केली ‘ही’ मोहीम

Rohan_P

लक्ष्मीटेकडी परिसरात सापडल्या डेंग्यूच्या अळय़ा

Patil_p

सातारा : प्रांत कार्यालयासमोरील पार्किंग जागेवर दुमजली वाहनतळ उभारणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!