तरुण भारत

भांडणानंतर किणये येथे घर पेटविले

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर, तिघा जणांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

वैयक्तिक कारणातून झालेल्या भांडणानंतर एका गटाने घराला आग लावल्याची घटना किणये (ता. बेळगाव) येथे मंगळवारी रात्री घडली. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली असून तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

भरतेश निंगाप्पा चौगुले या आसाम रायफल्समधील जवानाचे घर पेटविण्यात आले असून या प्रकरणी महेश मारुती डुकरे, पिंटू मारुती डुकरे, नामदेव काशिनाथ डुकरे या तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. भरतेशने दिलेल्या फिर्यादीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मुत्ताण्णा सरवगोळ पुढील तपास करीत आहेत. या घटनेने मंगळवारी रात्री किणये परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तणाव निवळला. यासंबंधी एकूण तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

वैयक्तिक कारणातून 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी भरतेशचे वडील निंगाप्पा चौगुले, आई लक्ष्मी व बहीण दुर्गादेवी यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी मंगळवारी सकाळी भरतेशने फिर्याद दिल्यानंतर रात्री त्याचे घर पेटविण्यात आले. या घटनेत सुमारे 3 लाखांचे नुकसान झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

Related Stories

बेळगाव-बेंगळूर महामार्गावर होणार 60 ते 70 चार्जिंग स्टेशन्स

Amit Kulkarni

फुटपाथ रिकामी करण्याची फेरीवाल्यांना सूचना

Amit Kulkarni

दि ऑर्चर्ड रिसॉर्ट येथे गोवन सीफूड फेस्टिवलला उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni

आर.एम.रेणके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Amit Kulkarni

हणमापूर क्रॉसजवळ 30 किलो चंदन जप्त

Amit Kulkarni

जुगारी अड्डय़ावरील कारवाई संशयाच्या भोवऱयात

sachin_m
error: Content is protected !!