तरुण भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक ; केली ‘ही’ मागणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासगी वेबसाईट narendramodi_in चे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सने यावरुन ट्वीट करत पंतप्रधान राष्ट्रीय रिलीफ फंडमध्ये क्रिप्टो करन्सीने दान देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्याने लगेचच हे ट्विट डिलीट केले. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 3.15 च्या सुमारास हॅकींगचा प्रकार घडला. बिटकॉईनद्वारे कोरोना सहाय्यता निधी द्यावा अशी मागणी  केली होती. 


पंतप्रधानांच्या या अकाउंटला 25 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. जॉन विक या अकाउंटने पंतप्रधानांचे अकाऊंट हॅक केले होते. याबाबत बोलताना ट्वीटरकडून सांगण्यात आले की, याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती आणि सुरक्षेसंदर्भात योग्य ती काळजी घेण्यात आली होती. आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहोत. आणखी कोणती अकाउंट हॅक झाली का ? याबद्दल अधिक माहिती नसल्याचेही ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले. 


याआधी देखील महत्वाच्या व्यक्तींची अकाउंट हॅक करण्यात आली होती. अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन, माजी अमेरिका राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अरबपती व्यावसायिक टायकून एलोन मस्क यांचे अकाउंट हॅक झाले होते.

Related Stories

शिवसेना-भाजपमध्ये राडा

triratna

कोरोनाचा उद्रेक : महाराष्ट्रात 23,350 नवे रुग्ण; 328 मृत्यू

Rohan_P

12 ते 18 वयोगटासाठी लवकरच ‘झायडस’ची लस

Patil_p

सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मोदी अचानक लेह-लडाखमध्ये दाखल

datta jadhav

शरद पवारांना राष्ट्रपती करण्याचा राऊतांनी बांधला चंग

prashant_c

हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P
error: Content is protected !!