तरुण भारत

मलेरियाचा धोका वाढला!

डासांमुळे होणार्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात विविध संशोधने, प्रयोग सुरु आहेत. त्यांना काही प्रमाणात यश येत असल्याच्या शक्यता निर्माण झालेल्या असतानाच मलेरिया या डासांमुळे होणार्या आजाराबाबत एक चिंताजनक बाब समोर आली आहे. अफ्रिकेत पहिल्यांदाच मलेरियाच्या आर्टिमिसिनिनया औषधाविरूद्ध प्रतिकारक्षमता विकसित होण्याचे प्रकरण समोर आले आहे.

नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, आर्टिमिसिनिन या औषधाविरोधात प्रतिकारक्षमता विकसित होणे ही काही नवी गोष्ट नाही. यापुर्वीही दक्षिण पूर्व आशियाच्या काही भागात गेल्या काही वर्षांपासून ह्या औषधाचा काहीही प्रभाव होत नाहीये.

Advertisements

अनेक देशांमध्ये तर 80 टक्के रूग्णांना या औषधाचा काहीही फायदा झालेला नाही. अर्थात, अफ्रिकेत आर्टिमिसिनिन हे औषध निष्प्रभावी ठरणे ही अधिक चिंतेची बाब आहे कारण मलेरियाचे दहापैकी 9 रूग्ण हे अफ्रिकेत समोर येतात.

अफ्रिकेतील ही बाब, रवांडातील राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रमादरम्यान समोर आली आहे. त्यामध्ये 257 पैकी 17 रूग्णांवर हे औषध निष्प्रभावी ठरले असल्याचे आढळून आले.

रवांडा मेडिकल सेंटर, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, कोचिन हॉस्पिटल आणि अमेरिकेचे कोलंबिया विद्यापीठ यांनी मिळून अफ्रिकेतील रवांडा मध्ये 257 रूग्णांचे रक्ताचे नमुने घेतले. त्याच्या अभ्यासानंतर दिलेल्या अहवालात 257 रूग्णांपैकी 19 रूग्णांवर आर्टिमिसिनिन हे मलेरियावरील औषध प्रभावी ठरले नाही.

तज्ञांच्या मध्ये 1950 च्या दशकात जेव्हा मलेरियावरील पहिले औषध क्लोरोक्वीन संशोधित करण्यात आले तेव्हा मलेरिया काही वर्षांतच संपून जाईल असे वाटले होते. परंतू गेल्या 7 दशकांमध्ये मलेरिया संपण्याऐवजी मलेरियाच्या विषाणूंनी हळूहळू आपल्यामध्ये औषधांचा प्रभाव निष्प्रभावी करण्याची क्षमता विकसित केली आहे.

अफ्रिकेसारख्या देशातच अशी विषाणूंमधील प्रतिकारक्षमता निर्माण होणे ही नक्कीच चिंतेची बाब आहे, कारण हा देशच मलेरियाच्या रूग्णसंख्येत पुढे आहे.

Related Stories

आरोग्यदायी पुदिना…

Omkar B

कोरोनाचा ‘दुसरा हल्ला’

Omkar B

ब्रेन टय़ुमरची लक्षणे ओळख

tarunbharat

दुसऱ्या लाटेचे नियोजन

Amit Kulkarni

हैपीटीएट्सचे औषद कोरोनावर प्रभावी

Amit Kulkarni

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू

tarunbharat
error: Content is protected !!