तरुण भारत

कोरोना रूग्णांसाठी शंभर बेडची सोय करू – अण्णा डांगे

प्रतिनिधी / आष्टा

कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. रूग्णांना उपचारासाठी कुठे ठेवायचे हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील आयुर्वेद कॉलेजचे रूग्णालय वापरायला द्यावे अशी अपेक्षा सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ङॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केली.

यास आम्ही प्रतिसाद देवून मिरजेच्या सेवासदन हॉस्पिटलचे प्रमुख ङॉ. मा. रविकांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आष्टा येथील ङॉ. व्हटकर, ङॉ. प्रविण कोळी, ङॉ. सुमित कबाङे, ङॉ. सुजय कबाङगे हे पन्नास रूग्णांची सोय होईल एवढ्या खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल तयार करित आहेत. असे स्पट करुन डांगे म्हणाले कोरोना रूग्णांची सोय करण्यासंबंधीची त्यांची ओढ व गरज लक्षात घेवून आम्ही पन्नासच काय शंभर बेङची सोय आमच्या आष्टा, ता. वाळवा येथील हॉस्पिटलमध्ये करून देण्यास तयार आहोत असे स्पष्ट केलं.

Related Stories

सांगली : अभय योजनेला प्रतिसाद;३ कोटींची थकबाकी वसूल

Abhijeet Shinde

सांगली : त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू; पोलिसांकडून संचलन

Sumit Tambekar

“मोरया’ च्या जयघोषात घरोघरी गणराय विराजमान

Abhijeet Shinde

सांगली महापालिका क्षेत्रात एलईडी दिव्यांसाठी ६० कोटींचा प्रस्ताव

Abhijeet Shinde

कुपवाडमध्ये तरुणावर कोयत्याने हल्ला: दोघांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

सांगली : मिरज पोलिसांचे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!