तरुण भारत

उत्तर प्रदेश : भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / लखनऊ : 


उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशातील भाजपच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रीता यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आल्यानंतर त्यांना लखनऊ मधील एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


दरम्यान, उत्तर प्रदेशात मागील चोवीस तासात 5,776 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत एकूण 1 लाख 85 हजार 812 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 57,598 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 3691 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

Related Stories

सर्वाधिक वयाच्या ‘साक्षर’ महिलेचे निधन

Amit Kulkarni

दिल्ली : सफदरजंग रुग्णालयातील आयसीयू वॉर्डला भीषण आग

Rohan_P

सांबामध्ये तीन ठिकाणी पाकिस्तानी ड्रोनचा वावर

datta jadhav

रेल्वेचा नवा रेकॉर्ड; इलेक्ट्रिक लाईनवर धावली पहिली डबल स्टेक कंटेनर

datta jadhav

अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी आज होणार जाहीर

Abhijeet Shinde

देशविरोधकांनी भारतीय चहालाही सोडले नाही!

Patil_p
error: Content is protected !!