तरुण भारत

बार्शी तालुक्यातून दोन जण हद्दपार

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग

वैराग पोलीस ठाण्यामध्ये वाळूचोरी आणि मारहाणीचे विविध गुन्हे दाखल असलेल्या दोघांना बार्शी तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या गुन्हेगारांमध्ये सैफन गालिब शेख आणि बंडू अभिमान सातपुते या दोघांचा समावेश आहे. याबाबत वैराग पोलीसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की,वाळूचोरी आणि मारहाणीच्या अनेक गुन्ह्यात आरोपी असलेले सैफन गालिब शेख, बंडू अभिमान सातपुते (दोघे रा. वैराग ) यांना मुंबई पोलीस कायदा १९५१चे कलम ५६ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी यांनी सहा महीन्यांसाठी बार्शी तालुक्यातून हद्दपार केले आहे. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस प्रमुख अतुल झेंडे, डीवायएसपी सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, हवालदार अनिल गोटे,पो शि अजय भुरले, महिला पोलीस ज्योती जाधव यांनी केली.

Advertisements

Related Stories

लातूर जिल्ह्यात निलंगा-अकोला बस व ट्रकचा भीषण अपघात; एकजण जागीच ठार

Abhijeet Shinde

राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा तीव्र निषेध

Abhijeet Shinde

गोवा बनावटीचा 44 लाखाचा मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

Abhijeet Shinde

फौजदार, सहाय्यक निरीक्षकांसह पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Abhijeet Shinde

उस्मानाबाद जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपची बाजी

Abhijeet Shinde

सोलापूर : ऊस वाहतूकदारांना वाहतूक कमिशन वाढवून देणार – खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!