तरुण भारत

रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाचा विळखा

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाचा विळखा वाढत आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात १७३ कोरोना पॉझिटिव्ह सापडले, असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
काल बुधवारी १४२ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी १७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी तालुक्या बरोबर चिपळूण, खेड तालुक्यातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. त्यामुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ३७२ वर पोहोचली आहे. आज ४९ रुग्ण बरे झाले तर आतापर्यंत २८८३ रुग्ण बरे झाले आहेत. आज रत्नागिरीतील ७० वर्षे व मंडणगडमधील ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला.

Advertisements

रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापार्‍यांच्या व कामगारांच्या अँटीजेन टेस्टमध्ये ९ जण पॉझिटिव्ह

रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत असणाऱ्या दुकानदार व्यापाऱ्यांची प्रशासनाच्या वतीने मोफत अँटीजेन टेस्ट घेण्यास सुरुवात झाली आहे. आज शहरातील व्यापारी व त्यांचे कर्मचारी, फेरीवाले अशा पंच्याहत्तर जणांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये नऊ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. रत्नागिरी येथील राधाकृष्ण मंदीर येथे आरोग्य विभागाच्या वतीने अजून दोन दिवस या टेस्ट होणार आहेत.

तपशिल पुढीलप्रमाणे (आरटीपीसीआर) – एकूण ६०
दापोली १, खेड २, चिपळूण १७, संगमेश्वर ७, रत्नागिरी २५, लांजा ८

( रॅपिड अँटीजेन टेस्ट ) – एकूण ११३
दापोली १, खेड ५२, गुहागर ५, चिपळूण २३, रत्नागिरी २३, लांजा ९

Related Stories

आसूद ग्रामस्थांचा नळपट्टी न भरण्याचा निर्णय

Abhijeet Shinde

दारी आलेल्या एसटी अधिकाऱयांना कर्मचाऱयांचा नकार

Patil_p

जिल्हय़ात आणखी तिघांचा मृत्यू

Patil_p

कोकण रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीतच

Patil_p

गोवा सीमेवर आजपासून थर्मल स्क्रीनिंग

NIKHIL_N

कोरोनाचा थेट चाचणी प्रयोगशाळेत शिरकाव

NIKHIL_N
error: Content is protected !!