तरुण भारत

महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा घरात बसून देण्यास राज्यपालांची परवानगी : उदय सामंत

  • अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा घोषित

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. यानुसार आता अंतिम वर्षाची परीक्षा घरात बसून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजी झाले असून त्यांनी मंजुरी दिली आहे. 

Advertisements


पुढे ते म्हणाले, अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जाणार असून परीक्षांचे निकाल 31 ऑक्टोबरपर्यंत लावण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा होतील आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी मनात कुठलाच संभ्रम न ठेवता अभ्यासाला लागावं, असे आवाहनही उदय सामंत यांनी केेले.

प्रॅक्टिकल परीक्षासुद्धा फिजिकली करायला लागू नये, अशी पद्धत अवलंबणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आज अहवाल फायनल करुन उद्या दुपारपर्यंत परीक्षा पद्धती कशा घ्यायच्या यावर पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न असल्याचे उदय सामंत म्हणाले. 

Related Stories

मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलाच्या युद्धनौका रवाना

datta jadhav

नृसिंहवाडी कुरुंदवाड परिसरात आषाढी एकादशी साजरी

Abhijeet Shinde

वनविभागाने वनमजुरांना कामावर घेण्याची दिली लेखी हमी

Abhijeet Shinde

कोरोना : महाराष्ट्रात धोका वाढला

Abhijeet Shinde

एप्रिलमध्ये इंधनाची मागणी घटणार

Omkar B

BS-IV श्रेणीतील नव्या वाहनांच्या नोंदणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

datta jadhav
error: Content is protected !!