तरुण भारत

दीपक पुनियासह दोन मल्लांना कोरोनाची बाधा

नवी दिल्ली : भारताचे वरिष्ठ गटातील पुरूष मल्ल दीपक पुनिया तसेच नवीन आणि कृष्णन या तिघांना  कोरोनाची बाधा झाल्याची माहिती साईच्या प्रवक्त्याने दिली आहे. या तिन्ही मल्लांची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यावेळी ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

टोकियो ऑलिंपिकसाठी 86 किलो वजनगटात दीपक पुनियाची यापूर्वीच निवड झाली आहे. त्याने विश्व कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. 65 किलो वजनगटात नवीन आणि 125 किलो वजनगटात कृष्णन हे सोनपत येथील साईच्या केंद्रामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय सराव शिबिरात दाखल झाले आहेत. आता या कोरोना बाधित मल्लांना काही कालावधीसाठी क्वॉरंटाईन ठेवण्यात येणार आहे. या कुस्ती सराव शिबिरात दाखल होण्यापूर्वी विविध राज्यांतून आलेल्या सर्व मल्लांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. 1 सप्टेंबर रोजी हे सर्व मल्ल सराव शिबिरासाठी एकत्र आले होते पण, पुनियासह तिघांना 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर प्रशिक्षणात समाविष्ट केले जाणार आहे.

Advertisements

Related Stories

भारतीय क्रिकेट संघाचे हेडिंग्लेत आगमन

Patil_p

प्ले-ऑफ निश्चितीसाठी मुंबईला आज शेवटची संधी

Amit Kulkarni

अमेरिकेच्या ब्रायन बंधूंचा टेनिसला निरोप

Patil_p

किदाम्बी श्रीकांत पुन्हा टॉप टेनमध्ये

Patil_p

स्वायटेक-बेन्सिक अंतिम लढत

Patil_p

वॉशिंग्टन सुंदर आयपीएल स्पर्धेतून बाहेर

Patil_p
error: Content is protected !!