तरुण भारत

ख्रिस गेलचा तो विक्रम यंदाही अबाधितच राहणार?

टी-20 क्रिकेट म्हणजे विस्फोटक खेळाचा जणू नजराणा. चौकार-षटकारांची आतषबाजी तर त्यात ओघानेच आली. त्यातही ख्रिस गेलसाठी तगडा, हुकमी फलंदाज असेल तर सीमारेषाही खुज्या भासू लागतात. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकारांचा विक्रम या ताडमाड उंचीच्या ख्रिस गेलच्या खात्यावरच आहे आणि तो यंदाही कोणी मोडण्याची खूपच कमी शक्यता आहे.

एकापेक्षा एक टोलजंग, गगनचुंबी षटकार खेचण्यात माहीर असलेल्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 124 डावात चक्क 326 षटकारांची आतषबाजी केली असून दुसऱया क्रमांकावरील एबी डीव्हिलियर्स (142 डावात 212 षटकार) त्याच्यापेक्षा बराच मागे आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचा पहिल्या पाचमध्येही समावेश नाही. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 190 षटकार फटकावले आहेत.

Advertisements

Related Stories

ऑस्ट्रेलियन महिलांची पुरुष संघाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

Omkar B

बाबर आझमचे अर्धशतक, पाक 2 बाद 121

Patil_p

पराभवाची मालिका खंडित करण्याचे दिल्ली-बेंगळूरचे ध्येय

Patil_p

प्रथमश्रेणीतील खराब फॉर्ममुळे रैनाचा विचार केला नाही

Patil_p

पाक युवा संघाचा बांगलादेश दौरा लांबणीवर

Patil_p

भारतीय हॉकीला हरजित, देविंदर यांची गरज : हरेंद्र सिंग

Patil_p
error: Content is protected !!