तरुण भारत

प्लिस्कोव्हा पराभूत, क्विटोव्हा, जोकोविचची आगेकूच

न्यूयॉर्क : सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने एका सेटची पिछाडी भरून काढत ब्रिटनच्या एडमंडचा पराभव करून अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱया फेरीत स्थान मिळविले तर महिला एकेरीत अग्रमानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाचे आव्हान संपुष्टात आले. याशिवाय अलेक्झांडर व्हेरेव्ह, नाओमी ओसाका, पेत्र क्विटोव्हा, अँजेलिक केर्बर, कॅरोलिन गार्सिया, पेत्र मार्टिक यांनीही तिसरी फेरी गाठली. मर्केटा व्होन्ड्रूसोव्हा व फ्रान्सची क्रिस्टिन म्लाडेनोविक यांना पराभवाचा धक्का बसला.

जोकोविचने ब्रिटनच्या काईल एडमंडवर 6-7 (5-7), 6-3, 6-4, 6-2 अशी मात करून 18 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. अलेक्झांडर व्हेरेव्हने अमेरिकेच्या ब्रॅन्डन नाकाशिमाचा 7-5, 6-7 (8-10), 6-3, 6-1 असा पराभव करताना 24 बिनतोड सर्व्हिस केल्या. बेल्जियमचा गॉफिननेही तिसरी फेरी गाठली.

महिलांमध्ये सहाव्या मानांकित क्विटोव्हाने कॅटरीना कोझलोव्हाचा कडवा प्रतिकार 7-6 (7-3), 6-2 असा मोडून काढत तिसरी फेरी गाठली. जर्मनीच्या केर्बरने आपल्याच देशाच्या ऍना लेना फ्रीडसमचा 6-3, 7-6 (8-6) असा सुमारे दीड तासाच्या खेळात पराभव केला. आठव्या मानांकित पेत्र मार्टिकने तिसरी फेरी गाठताना युक्रेनच्या कॅटरीना बोन्डारेन्कोवर 6-3, 6-4 अशी मात केली. अग्रमानांकित प्लिस्कोव्हाचा पराभव मात्र धक्कादायक ठरला. तिला फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाने 6-1, 7-6 (7-2) असे नमवले.

Related Stories

देशभरात ऑनलाईन क्लासेसची चलती : माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन

Patil_p

मँचेस्टर सिटीचा एव्हर्टनवर विजय

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून

Patil_p

रशियाचा आंद्रे रूबलेव्ह अजिंक्य

Patil_p

अन् त्याने डोंगरमाथ्यावरुन सामना पाहिला!

Amit Kulkarni

नापोलीचा सलग पाचवा विजय

Patil_p
error: Content is protected !!