तरुण भारत

जगभरात 1.86 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात आतापर्यंत 2 कोटी 64 लाख 97 हजार 906 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 86 लाख 81 हजार 337 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

गुरुवारी जगभरात 2 लाख 88 हजार 201 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 5901 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 8 लाख 73 हजार 746 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 69 लाख 42 हजार 833 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 60 हजार 776 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 63 लाख 35 हजार 244 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 35 लाख 75 हजार 076 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 91 हजार 058 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 40 लाख 46 हजार 150 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 32 लाख 47 हजार 710 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 24 हजार 729 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

पाकच्या रेल्वेमंत्र्यांकडून भारताला अणुहल्ल्याची धमकी

datta jadhav

पाणबुड्यांसाठी AIP सिस्टीम पुरविण्यास जर्मनीचा पाकिस्तानला नकार

datta jadhav

तालिबानसोबत युद्धाची मोठी तयारी

Patil_p

रशियात सिंगल डोस लसीला मंजुरी

Amit Kulkarni

मल्ल्याच्या फ्रान्समधील मालमत्ता ईडीकडून जप्त

datta jadhav

स्कॉट एटलस यांचा राजीनामा

Omkar B
error: Content is protected !!