तरुण भारत

डाळिंबाला प्रतिकिलो १५७ रुपये विक्रमी दर

प्रतिनिधी / आटपाडी

कोरोनाच्या संकट कालावधीनंतर नव्या उमेदीने सुरू झालेल्या आटपाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळींब सौदे बाजारात शुक्रवारी विक्रमी दराने सलामी दिली. माळशिरस (जि.सोलापूर) येथील शेतकऱ्याच्या उच्च प्रतिच्या डाळिंबाला प्रति किलो तब्बल १५७ रूपये इतका सौदे बाजारात दर मिळाला आणि या उच्चांकी दराबद्दल बाजार समितीने शेतकऱ्याचा गौरव केला.

सांगली, सातारा सोलापूर जिल्ह्यात आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजाराने चांगलाच बोलबाला निर्माण केला आहे. बागेत वाया जाणाऱ्या डाळिंबालाही येथे चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा ओढा सौदे बाजारात आहे. शिवाय आर्थिक फसवणूक नसल्याने अनेकांनी थेट बागेतून माल व्यापाऱ्यांना देण्याऐवजी सौदे बाजारात डाळिंबाची विक्री करण्याला प्राधान्य दिले आहे

Advertisements

कोरोनाच्या संकट कालावधीत अनेक महिने आटपाडीचा डाळिंब अडत बाजार बंद राहिला. परिणामी त्याचा फटका शेतकयांसह व्यापारी, अडतदारांनाही सहन करावा लागला. प्रदिर्घ विश्रांतीनंतर आत्ता बाजार पूर्ववत असुन चांगल्या प तिची डाळिंब आटपाडीच्या सौंदे बाजारात दाखल होताहेत त्यांनाही चांगला दर मिळत असल्याने बाजार समितीचा बोलबाला वाढला आहे. हणमंत गोरे (ता.माळशिरस) हे शेतकरी नियमीतपणे आटपाडीच्या सौदे बाजारात डाळिंब घेऊन येत असतात.

Related Stories

सांगली : कडेगाव तालुक्यात मनसेमध्ये अनेकांचा पक्ष प्रवेश

Abhijeet Shinde

कडेगाव तालुक्यात पाण्याअभावी पिके धोक्यात; शेतकऱ्यांना टेंभूच्या पाण्याची प्रतिक्षा

Abhijeet Shinde

सांगली : जिल्हा परिषद शिक्षक हंकारे सरांची ‘वर्ड मॅचिंग’ गेम राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट गेम

Abhijeet Shinde

सांगली : कडेगावमध्ये पाणी संघर्ष समितीच्यावतीने वीज बिलांची होळी

Abhijeet Shinde

महापूर ओसरतोय, महामार्ग सुरू

Abhijeet Shinde

सांगली : तासगाव येथील `त्या’ खुनाचा उलगडा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!