तरुण भारत

चीनचे ‘सुखोई-35’ विमान तैवानकडून टार्गेट

व्हिडीओ व्हायरल : विमान पाडण्यासाठी पेट्रियाट मिसाइल डिफेन्स प्रणालीचा वापर

वृत्तसंस्था/ बीजिंग

Advertisements

चीनबरोबर मागील बऱयाच काळापासून सुरु असणाऱया संघर्षानंतर तैवानने शुक्रवारी चीनचे सुखोई-35 फायटर जेट पाडल्याची बातमी समोर आली आहे. चीन आणि तैवानने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तैवानने आपल्या हवाई हद्दीत शिरल्यामुळे चीनच्या सुखोई-35 वर निशाणा साधत ते पाडल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या हल्ल्यासाठी तैवानने अमेरिकन बनावटीच्या पेट्रियाट मिसाइल डिफेन्स प्रणालीचा वापर झाला आहे.

तैवानने हा हल्ला केल्याची शक्मयता व्यक्त केली जात असल्याने अमेरिकने आपल्या नौदलाला सज्ज राहण्याचा इशारा दिल्याचेही वृत्त आहे. तैवानने खरोखरच हे जेट पाडले असेल तर चीन आणि तैवानमधील युद्धाची ही ठिणगी ठरु शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनविरोधी वातावरण असून सीमा प्रश्नावरून अनेक देशांशी चीनचा वाद आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकने करोनाच्या मुद्यावरुन चीनशी वाद झाल्यानंतर पॅसिफिक महासागरामधील युद्ध नौकांची संख्या वाढवली आहे. ऑस्ट्रेलियानेही चीनविरोधी भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सध्या दक्षिण चीनच्या समुद्रात संघर्ष झालाच तर चीन विरोधात इतर सर्व देश असं चित्र पाहायला मिळू शकते.

मागील बऱयाच काळापासून दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये चीन आणि इतर शेजारी देशांमध्ये सीमा प्रश्नांवर खटके उडत आहेत. त्यातच चीनचा शेजारी असणाऱया तैवानमध्येही चीनविरोध वाढताना दिसत आहे. तैवानवरही हक्क सांगणाऱया चीनला तैवानने अनेकदा इशारा दिल्यानंतरही त्याकडे चीनने अधिक गांभीर्याने लक्ष दिले नाही. याच संघर्षामधून तैवानने चीनचे हे फायटर जेट पाडल्याचा दावा केला जात आहे.

संघर्ष चिघळणार

तैवानने चीनला अनेकदा हवाई सीमांचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही अनेकदा चिनी फायटर जेट्स तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करत होती. आज तैवानने अखेर हवाई हद्दीचे उल्लंघन करणाऱया चिनी विमानाला टार्गेट केले. यामध्ये विमानाचा पायलट जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष चिघळण्याची शक्मयता आहे.

Related Stories

ह्युस्टनच्या पोस्ट कार्यालयाला शीख अधिकाऱयाचे नाव

Patil_p

चीनमध्ये 8 हजार वर्षे जुना पिरॅमिड

Patil_p

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसफजाई झाली पदवीधर

datta jadhav

भारतीय हॉकी संघाचे पुनरागमन; स्पेनचा 3-0 ने पराभव

datta jadhav

व्हिएतनाममध्ये संक्रमणाचा धोका

Patil_p

तालिबानला मान्यता नाहीच…

datta jadhav
error: Content is protected !!