तरुण भारत

जेईई, नीट परीक्षा निर्धारित वेळेतच

सहा राज्यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करणाऱया याचिका बिगर भाजपशासित राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. तथापि शुक्रवारी सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने त्या फेटाळल्या आहेत. 17 ऑगस्ट रोजी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल केल्या होता. तथापि याआधीचा निकाल पूर्ण वाचावा, अशी सूचना करत त्या फेटाळून लावल्या आहेत. यामुळे जेईई व नीट परीक्षा निर्धारित वेळेतच होणार आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्यात याव्यात, असे सांगून मंजुरी दिली होती. तथापि त्याला विरोध करत बिगर भाजपशासित राज्यांकडून याला विरोध करण्यात आला. देशात कोरोना संकट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. तथापि या आधीच्या आदेशानुसार या परीक्षा सुरू झाल्या असून त्या वेळेतच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Related Stories

मान्सूनचे आगमन लांबणीवर

datta jadhav

ऐच्छिक वाहन स्क्रॅप धोरणाची घोषणा

Patil_p

नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी आग्रही

datta jadhav

बाबा रामदेवांच्या औषधावर निर्बंध

Patil_p

‘झायडस’च्या माध्यमातून देशात येणार चौथी लस

Patil_p

नवी दिल्ली : लाजपत नगर मार्केटमधील कपड्यांच्या शोरूममध्ये भीषण आग

Rohan_P
error: Content is protected !!