तरुण भारत

तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून सुरुवातीलाच रोखावे !

काश्मीरातील दहशतवादासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार : महिला पोलीस बजावू शकतात प्रभावी भूमिका

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाच्या अनुषंगाने बोलताना सुरुवातीच्या काळातच तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याची गरज आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. स्थानिक महिलांना सहभागी करून हे काम महिला पोलीस कर्मचारी करू शकतात, असे ते म्हणाले.

देशभरातील नागरी सेवा अधिकाऱयांना कुशल आणि प्रशिक्षित करण्याच्या पद्धतीत मोठे बदल घडवून आणू पाहणारे मिशन कर्मयोगी सरकारने जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी शुक्रवारी मोदी यांनी दीक्षांत संचलनादरम्यान आयपीएस प्रशिक्षणार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. हैदराबादमधील सरदार वल्लबभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे हा कार्यक्रम झाला.

एका प्रशिक्षणार्थी महिलेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी काश्मीरमधील लोकांचे कौतुक केले. ते म्हणाले की, काश्मिरी हे प्रेमळ लोक आहेत आणि नवीन गोष्टी शिकण्याची त्यांच्यात खास क्षमता आहे. अपाण या लोकांशी खूप जोडले गेलेलो आहे. आम्हाला सर्वांना एकत्र येऊन मुलांना चुकीच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी कार्य करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिलाशक्ती बजावू शकते भूमिका

हे काम आमच्या महिला पोलीस अधिकाऱयांकडून कार्यक्षमपणे केले जाऊ शकते. आमची महिलाशक्ती तेथील मातांना शिक्षित बनवून त्या मुलांना परत आणण्याचे कार्य प्रभावीपणे करू शकते. आपण असे केल्यास सुरुवातीच्या काळातच मुलांना चुकीच्या मार्गावर प्रवेश करण्यापासून रोखू शकू असा विश्वास आपल्याला आहे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.

आपला पेशा असा आहे की, जेथे अनपेक्षित गोष्टींचा सामना करावा लागण्याच्या शक्यता खूप जास्त असतात. त्यासाठी आपण सर्व जण सावध आणि सज्ज असले पाहिजे. तेथे उच्च पातळीचा ताण असतो आणि म्हणूनच आपल्या जवळच्या लोकांबरोबर आणि प्रियजनांबरोबर संवाद साधणे महत्त्वाचे आहे. वेळोवेळी वा एखाद्या सुट्टीच्या दिवशी, आपल्या शिक्षकासारख्यांची भेट घ्या किंवा किंवा ज्यांच्या सल्ल्याला आपण महत्त्व देता त्यांची भेट घ्या, असाही सल्ला मोदींनी दिला.

मनापासून काम करा

यावेळी संवाद साधताना पंतप्रधानांनी तणावग्रस्त परिस्थितीत काम करणाऱयांसाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. तणावाखाली काम करणाऱया सर्वांसाठी योग आणि प्राणायाम चांगले आहेत. आपण मनापासून कोणतेही काम केल्यास आपल्याला नेहमीच फायदा होईल आणि कितीही काम केले, तरी आपणास कधीही ताण जाणवणार नाही, असे ते पुढे म्हणाले. 

दिल्लीमध्ये आपण येथून उत्तीर्ण होऊन पुढे गेलेल्या तरुण आयपीएस अधिकाऱयांशी नियमितपणे संवाद साधत असतो. यावषी कोरोनामुळे आपणा सर्वांना भेटता आलेले नाही. पण आपल्याला खात्री आहे की, पुढील कार्यकाळात आपली नक्कीच कधी ना कधी भेट होईल, असे उद्गार मोदींनी काढले. अकादमीतील सुमारे 28 महिलांसह 131 आयपीएस प्रशिक्षणार्थ्यांनी 42 आठवडय़ांच्या प्राथमिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण केले आहे.  

‘खाकी वर्दीविषयीचा आदर कधीही गमावू नका’

कोविड-19 च्या महामारीच्या काळातील पोलिसांच्या कामाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, खास करून या साथीच्या काळात पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामामुळे खाकी वर्दीचा मानवी चेहरा लोकांच्या आठवणीत कोरला गेला आहे. आपल्या गणवेषाची ताकद दाखविण्यापेक्षा त्या गणवेषाचा अभिमान बाळगणे फार महत्त्वाचे आहे. आपल्या खाकी गणवेषाबद्दलचा आदर कधीही गमावू नका, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

Related Stories

अयोध्येतून निवडणूक लढविणार योगी?

Patil_p

सागर राणाच्या पीएम अहवालानंतर सुशील कुमारच्या अडचणीत वाढ

triratna

रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

datta jadhav

चिपयुक्त ई-पासपोर्ट लवकरच मिळणार

Patil_p

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया कोरोना पॉझिटिव्ह

pradnya p

केरळमध्ये कियोस्क

Patil_p
error: Content is protected !!