तरुण भारत

पेडणे सावळवाडा क्रीडा संकुलातील कोरोना निगा केंद्र रविवार 6 रोजी कार्यान्वित

पेडणे  (प्रतिनिधी)

पेडणे तालुक्मयाचे कोरोना निगा केंद्र हे रविवार 6 सप्टेंबर रोजी कार्यान्वति होणार असल्याचे मांदे मतदार संघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी गुरुवारी सावळवाडा येथील कोरोना निगा  केंद्राला भेट देऊन पाहणी केल्यानंतर पञकारांकडे बोलताना जाहिर केले.

Advertisements

   पेडणे तालुक्मयात दिवसेंदिवस  वाढती रुग्णसंख्या मिळत असल्याने आणि गोवा राज्यात वाढते रुग्ण व त्यांना कोरोना निगा केंद्रात जागा मिळत नसल्याने  आता सावळवाडा येथील हे केंद्र तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार सोपटे यांनी दिली.

   ड़ केंद्रात शंभर रुग्णांची सोय होणार असून एका विभागात  पुरुष तर दुसऱया विभागात महिला रुग्णांची सोय करण्यात येणार असल्याचे सोपटे यांनी सांगितले .

 गुरुवारी सायंकाळी मांदे मतदारसंघाचे आमदार यांनी दयानंद सोपटे यांनी सावळवाडा येथील कोरोना निगा केंद्राची पहाणी केली. यावेळी नगराध्यक्षा श्वेता कांबळी, नगरसेविका  उषा कांबळी, नगरासेवक सिध्देश पेडणेकर , पेडणे उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर,  तुये आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डा?.विद्या परब, डा?.बाबू केरकर, ममता प्रभुदेसाई, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, विर्नोडा सरपंच मंगलदास किनळेकर, तुये सरपंच सुहास नाईक, पेडणे क्रीडा आधिकारी सदानंद सावळ देसाई,    धारगळ पंच प्रदीप नाईक , विर्नोडा पंच प्रशांत परब , नईबाग पंच राकेश स्वार , ज्ञानेश्वर परब,  माजी सरपंच सीताराम परब, प्रदिप परब, गुरु कोल्हे , सुर्तुयकांत  चोडणकर ,  तुळशीदास कवठणकर, आनंद सावळ, विनोद सावळ, नितू सावळ देसाई  आदी उपस्थित होते.

गोवा राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत पेडणे तालुक्मयात मध्यवर्ती ठिकाणी सावळवाडा येथील क्रीडा संकुलात कोरोना निगा केंद्र सुरु करण्याचे सरकारने ठरविले होते.त्यानंतर गेले दोन महिने या केंद्राचे काम मंदगतीने सुरु होते.

ड़ दैनिक तरुण भारत वृत्ताची दखल

सावळवाडा येथील कोरोना निगा केंद्र तातडीने सुरू करण्यासंबधी समाझा कार्यकर्ते सीताराम परब तसेच भाजपचे ज्ये÷ कार्यकर्ते सुशांत मांदेकर यांनी केंद्राला होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त करत सदर केंद्र लवकर सुरू करावे अशी मागणी केली होती. उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांनी हे केंद्र लवकर  सुरु करण्यासाठी विशेष लक्ष घालावे अशी मागणी गुरुवारी दैनंदिन तरुण भारत मधून केली होती  याची दखल घेत मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे व  उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांची चर्चा होऊन आज आमदार सोपटे यांनी या केंद्राची पहाणी केली व हे केंद्र रविवारी सुरू कराण्याचे निर्णय घेतला.

ड़ आमदार सोपटे यांनी मानले उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांचे आभार

पेडणे तालुक्मयात कोरोना निगा केंद्र सुरु व्हावे यासाठी पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा उपमुख्यमंञी बाबू आजगावकरयांनी विशेष लक्ष घालून क्रीडा संकुलाची जागा देण्याचे निश्चित केले.त्यामुळे हे केंद्र आज याठिकाणी करण्याचा निर्णय झाला.त्याबद्दल उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांचे आपण आभार मानतो असे सोपटे म्हणाले. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत हे केंद्र लवकर सुरु होणे गरजेचे होते माञ एक महिना होऊनही काम मंद होते आता उपमुख्यमंञी यांच्याशी चर्चा करून आम्ही  तातडीने येत्या रविवारी हे केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

ड़ सर्व साधनसुविधा मिळणारः सोपटे

या केंद्र ज्या सुविधा पाहिचे त्यासंबंधी उपमुखूयमंञी , मुख्यमंञु तसेच आरोग्य मंञी यांच्याशी चर्चा करण्यात येत असून पाणी वीज तसेच रुग्णासाठी शौचालय आदी सर्व गोष्टींची   पूर्तता करण्यात येणार आहे.

ड़ पेडणे तालुक्मयातील वाढती रुग्णसंख्या यासाठी कोरोना निगा केंद्र हे काळाची गरजः सोपटे

सोपटे म्हणाले पेडणे तालुक्मयात दरदिवशी तीसच्या पेक्षा रुग्ण मिळतात.या रुग्णाना राज्यातील इर निगा केंद्रात जागा मिळत नाही.म्हणून हे केंद्रा लवकरात लवकर सुरु होणे ही काळाची गरच असल्याचे सोपटे म्हणाले .

ड़ केंद्रासाठी खास  डाक्टर्स परिचारीका तसेच अन्य कर्मचारी यांचीही सोय करण्यात येणार

या कोरोना निगा केंद्रासाठी पेडणे तालुक्मयातील दोन आरोग्य केंद्रातील डा?क्टर व अन्य स्टाफ हा कमी पडणार असून यासाठी खास आरोग्य मंञ्याकडे चर्चा करुन स्टाफ याठिकाणी घेण्यात येईल असे सोपटे यांनी सष्ट केले.

ड़ यावेळी आमदार सोपटे यांनी आरोग्य अधिकारी डा?.विद्या परब तसेच पेडणे उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर यांच्याशी चर्चा करुन ज्या काही केंद्र सुरु करण्यासाठी ञुटी आहेत त्या सोडवून हे केंद्र राविवारी सुरु करण्याच्या दृष्टीने काम करावे असे सांगितले .

Related Stories

ढिसाळ सरकारी यंत्रणेमुळेच कोरोनाचा कहर

Amit Kulkarni

मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने घेतली वाहतूक संचालकाची भेट

Omkar B

संजीवनच्या गृह परिचारिकांकडून कोरोना काळात रुग्णांना सेवा

Amit Kulkarni

‘थर्टीफस्ट’साठी पर्यटकांची गोव्याला पसंती

Omkar B

सरकारच्या गोमंतकीयविरोधी धोरणांना विरोध करण्याची गरज

Patil_p

कोरोना कचरा विल्हेवाटीसाठी 25 कोटीचा प्रकल्प

Patil_p
error: Content is protected !!