तरुण भारत

कोविडसंदर्भात जागृतीऐवजी फैलावास हातभार लागेल

गोवा फॉरवर्डचा केपे मामलेदारांच्या परिपत्रकास आक्षेप

प्रतिनिधी/ मडगाव

केपे मामलेदारांनी एक परिपत्रक काढून पंचायत प्रभागांतील लोकांमध्ये कोविड-19 संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण दिलेल्या शिक्षकांना नियुक्त केले आहे. सध्या कोविडचा वाढता फैलाव सुरू असताना सुमारे दीड ते दोन हजार लोकांना एका सभागृहात एकत्रित आणणे म्हणजे अशाने कोविड नियंत्रणात येण्याऐवजी जागृती कार्यक्रमांमुळेच कोविडचा आणखी फैलाव होईल, असा दावा करून गोवा फॉरवर्ड पक्षाने या परिपत्रकाला आक्षेप घेतला आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी त्वरित हस्तक्षेप करून सदर परिपत्रक मागे घेण्यास सांगावे, अशी मागणी त्यांनी उचलून धरली आहे.

पक्षाचे प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी फातोर्डात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील मागणी करताना पक्षाचा पवित्रा स्पष्ट केला. काही महिन्यांपूर्वी शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षकांना कोविडसंदर्भात जागृती करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यावेळी ते योग्य होते. मात्र आता कोविडचा फैलाव एवढा वाढला आहे की, दिवसाला 700 च्या घरात बाधित आढळत आहेत आणि 10 जणांचे प्राण जात आहेत. अशा वेळी चार-चार प्रभांगातील सुमारे दीड ते दोन हजार लोकांना एका सभागृहात जमा करून जागृती मोहीम करणे म्हणजे कोविडचा फैलाव अधिक करण्यास हातभारच लावण्यासारखे आहे, अशी टीका नाईक यांनी केली व सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा सवाल उपस्थित केला.

सोशल मीडिया, प्रसारमाध्यमांचा वापर करणे शक्य

बहुतांश लोकांना कोविडचा संसर्ग होण्यापासून दूर राहण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात ते आतापर्यंत विविध माध्यमांतून झालेल्या जनजागृतीमुळे चांगलेच ठाऊक आहे. काही जण बेफिकीरपणा करत आहेत हेही खरे असले, तरी त्यासंदर्भातील जागृतीसाठी सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांचा वापर करणे शक्मय आहे, असे नाईक यांनी नजरेस आणून दिले.

केपे मामलेदारांनी काढलेले परिपत्रक गोवा फॉरवर्डच्या हाताला लागले असून अशी परिपत्रके अन्य पंचायत वा पालिका क्षेत्रांत जागृती करण्यासाठी काढलेली असण्याची शक्मयता त्यांनी फेटाळली नाही. ऑगस्ट महिन्यात हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे व 6 सप्टेंबरपासून या जागृती मोहिम राबविण्यात याव्यात असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे याकडे नाईक यांनी लक्ष वेधले. कोविडच्या फैलावास निमित्त न ठरता या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी हस्तक्षेप करतील आणि सदर परिपत्रक मागे घेतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

लाटंबार्से पराभवाची जबाबदारी आपली

Omkar B

1473 प्रवाशांना घेऊन श्रमिक ट्रेन हिमाचल प्रदेशकडे रवाना

Omkar B

फोंडा मतदार संघात ‘कमळ’ फुलणार !

Patil_p

कर्नाटकातून आडवाटांनी गोव्यात प्रवेशाच्या वृत्ताने खळबळ

Omkar B

संजीवनी बंद केल्यास हजारो कुटुंबांवर उपासमारीची पाळी

Patil_p

503 नवे रुग्ण, 688 जण कोरोनामुक्त

Patil_p
error: Content is protected !!