तरुण भारत

चन्नम्मा चौकात वाहतुकीची कोंडी

चन्नम्मा चौक ते आरटीओपर्यंतची वाहतूक वळविल्याने समस्या

बेळगाव / प्रतिनिधी

Advertisements

चन्नम्मा चौक ते आरटीओ सर्कल दरम्यान स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ता करण्याचे काम सुरू आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक सिव्हिल हॉस्पिटल रोडमार्गे वळविण्यात आली आहे. रस्ता बंद असल्याने सिव्हिल हॉस्पिटल रोडवर वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नागरिकांना निश्चितस्थळी पोहोचण्यास वेळ लागत आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील प्रमुख मार्गांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. चन्नम्मा चौकातील काँक्रिटीकरणाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. चन्नम्मा चौक ते आरटीओ या पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. यामुळे चन्नम्मा चौकातून आरटीओ सर्कलकडे जाणारी वाहतूक सिव्हिल हॉस्पिटल रोड, कृष्णदेवराय सर्कल (कोल्हापूर सर्कल) मार्गे वळविली आहे. यामुळे वाहन चालकांना वळसा घालून पुन्हा आरटीओ सर्कल येथे यावे लागत आहे.

वाहतुकीत बदल करण्यात आल्यामुळे चन्नम्मा चौकात कोंडी होत आहे. न्यायालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱया नागरिकांना काकतीवेस रोडमार्गे यावे लागत आहे. यामुळे वाहतुकीच्या कोंडीत वाढ होत असून रहदारी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत होणारे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.

Related Stories

केएलई स्वशक्ती महिला सक्षमीकरण कक्षातर्फे स्पर्धा

Omkar B

मसणाई देवीची यात्रा भरविण्यासाठी आतातरी मुभा द्या

Amit Kulkarni

शिक्षण संस्थांत कोरोनाचा स्फोट

Amit Kulkarni

टॅक्सी ओनर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशनतर्फे वृक्षारोपण

Amit Kulkarni

माणिक विंग्स फुटबॉल स्पर्धेत दिनेश खणगावकर एफसी संघ विजेता

Omkar B

उचगाव साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे नेतृत्त्व लोकमान्य सोसायटीकडे

Patil_p
error: Content is protected !!