तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांक १०९३ कोरोनाबाधित

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात गेल्या २४ तासामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी रुग्णसंख्येची भर पडली. गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवारी रात्री पर्यंत १०९३ रुग्णांची भर पडल्याने जिह्यात समूह संसर्गाचा धोका वाढत चालला आहे. यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. दिवसभरात २४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

Advertisements

दिवसभरात शहरामध्ये 353 नव्या रुग्णांची भर पडल्याने महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी आरटीपीसीआर द्वारे 1922 जणांचे स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी 1422 स्वॅब निगेटिव्ह आले. तर 519 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ऍटिजेन टेस्टद्वारे 700 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली. यापैकी 57 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर 613 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

आजरा 31 , भुदरगड 6, चंदगड 10, गडहिंग्लज 36, गगनबावडा 3, हातकांगले 119, कागल 77, करवीर 141, पन्हाळा 36, राधानगरी 38, शाहूवाडी 7, शिरोळ 73, नगरपालीका 98, महापालीका 353, इतर जिह्यातील किंवा राज्यातील 65 असे एकूण 1093 नवे रुग्ण शुक्रवारी आढळले. यापैकी शहरामध्ये सर्वाधिक म्हणजेच 353 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. शहरामध्ये आता समूह संसर्ग झपाटय़ाने होत आहे. यामुळे रुग्णांना बेड, ऑक्सिजन बेड कमी पडत आहेत.

आज अखेर एकूण कोरोनाग्रस्त
आज अखेर कोरोनाग्रस्त 27437
एकूण कोरोनामुक्त 17310
उपचार घेणारे 9299
आजचे पॉझिटिव्ह 1093
एकूण मृत्यू 828
दिवसभरातील मृत्यू 24

जिह्यातील मृत्यू
वाघवे (ता. पन्हाळा) येथील 64 वर्षीय पुरूष, वसगडे (ता. करवीर) येथील 85 वर्षाचा वृद्ध,  आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) वृद्ध 70 वर्ष, यशवंत कॉलनी इचलकरंजी 53 पुरुष, तोडकर मळा इचलकरंजी 70 वर्षीय महिला, तारदाळ (ता. हातकणंगले) 70 वर्षीय महिला, रांगोळी (ता. हातकणंगले) 65 वर्षीय पुरुष, वारणा कोडोली (ता. पन्हाळा) 64 वर्षीय पुरुष, शिवाजी नगर, मिरज (सांगली) 76 वर्षीय पुरुष, बहिरेवाडी (ता. पन्हाळा) 76 वर्षीय पुरुष, तासगांव (सांगली) 77 वर्षीय पुरुष, दानवाड (ता. शिरोळ) 52 पुरुष, हेर्ले (ता. हातकणंगले) 70 वर्षीय महिला, अब्दुललाट (ता. शिरोळ) 55 वर्षीय पुरुष, कबनुर (ता. हातकणंगले) 76 वर्षीय महिला, येवती 68 वर्षीय पुरुष, हालोंडी (ता. हातकणंगले) येथील 60 वर्षीय पुरुष

शहरातीलमृत्यू
पाचगाव (ता. करवीर) 80 वर्षीय पुरुष, आर. के. नगर 71 वर्षीय पुरुष, शिवाजी पेठ 52 वर्षीय पुरुष, शिवाजी पेठ 54 वर्षीय पुरुष, नागाळा पार्क येथील 67 वर्षीय पुरुष, रविवार पेठ कोल्हापूर 63 वर्षीय पुरुष,

Related Stories

इचलकरंजीतील कुख्यात बाबर गँगविरोधी मोकाअंतर्गत कारवाई

Sumit Tambekar

शाहू समाधी स्मारकाच्या दुसऱया टप्प्यासाठी पाठपुरावा करू – विजय वडेट्टीवार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यात कोरोनाग्रस्तांची शंभरी पार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या सत्ताधाऱ्यांची याचिका फेटाळली

Abhijeet Shinde

शहापूर पोलीसांच्या सतर्कतेमुळे 5​ तासात मिळाली​ बेपत्ता मुलगी

Abhijeet Shinde

गुन्हेगार डॉ. बांदिवडेकरला पोलीस कोठडी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!