तरुण भारत

कोल्हापूर : अंबपवाडीजवळील खुनाचा उलगडा, पाच आरोपींना अटक

प्रतिनिधी/पेठ वडगाव

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अंबपवाडी रोडवर बेदम मारहाण करून टाकलेला अज्ञात मृतदेह गुरुवारी सापडला होता. वडगाव पोलिसांनी अवघ्या ३६ तासात या खुनाचा छडा लावला. मयत हा फिरस्ता असून त्याच्या विक्षिप्त वागण्याला कंटाळून बावडा येथील पाच जणांनी हे कृत्य केल्याचे कबुल केले आहे. या पाच जणांना रात्री ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी सांगितले.

निखिल रघुनाथ बिरंजे (वय-२५, रा.पिंजार गल्ली) सुशांत जयवंत माने (१८,रा. मातंग वसाहत), दत्तात्रय हिंदुराव शिंदे (४८, रा. जय भवानी गल्ली), योगेश रविंद्र तांदळे (२५, रा. जय भवानी गल्ली दत्त मंदिर रोड), शुभम सचिन कोळी (२१, रा.चावडीजवळ) हे सर्वच जण कसबा बाबडा येथील असून यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अंबपवाडी रोडवर अज्ञात इसमाचा बेदम मारहाण करून मृतदेह टाकला होता. वडगाव पोलिसांना याची माहिती मिळाली असता या खुनाचा तपासाची चक्रे गतिमान केली. तपासामध्ये मृत इसम कसबा बावडा येथे नवनाथ मठ येथे फिरस्ता म्हणून राहण्यास होता. लोक त्याला महाराज म्हणत असत. या परिसरातील लोक त्याला गेल्या सहा महिन्यापासून माणुसकीच्या भावनेतून जेवण-नाष्टा देत होते. मात्र हा फिरस्त वेडाच्या भरात कधी कधी लोकांच्या घरावर विष्टा ठेवत होता असे कृत्य करण्याचा प्रयत्न करत होता. तर, काही दिवसापूर्वी नवनाथ मंदिरातील देवांच्या मूर्ती पितळी मूर्ती नेवून शेतात पुरल्या होत्या. तर मारहाण करणार्‍यामधील निखील बिरंजे याच्या भाऊ नवनाथ मठात सेवेकरी आहे. पाच-सहा दिवसापूर्वी या मारहाणीत मयत झालेल्या फिरस्त्याने त्याच्या अंगावर धावून जावून भीती घातली होती. यामुळे या आंधळ्या भावाने धसका घेतला होता.

या सर्व प्रकाराला कंटाळून संशयित आरोपी असलेल्या या पाच जणांनी या फिरस्त्याला गावाबाहेर हायवेला सोडण्याचे ठरविले. त्याला पकडण्यास गेले असता त्याने दगड विटा फेकुन मारू लागला. यामुळे या संशयित आरोपींनी त्याला काठयांनी मारहाण करून त्याचे हातपाय बांधुन टेम्पोतून आणून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी रोडवर आणुन टाकले यानंतर झालेल्या मारहाणीमुळे रात्रीत त्याचा मृत्यू झाला.

हा गुन्हा जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख, गडहिग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, डीवायएसपी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पो.ना.दुकाने यांच्या खबरीकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परि.पो.उपअधीक्षक गिल्डा, सपोनि निशानदार, पोलीस हवालदार राजेश पाटील, पो.ना.रोटीवाले, पो.शि.दादा माने, पोलीस शिपाई राक्षे, संदीप गायकवाड, घस्ते यांनी उघडकीस आणला.

Related Stories

शेतकऱ्यांच्या प्रलंबित कामांचा त्वरीत निपटारा करण्याची शिवसेनेची महाराष्ट्र बँकेकडे मागणी

Abhijeet Shinde

बेलवळे बुद्रुक येथे ५५ एकर ऊस जळून खाक; पाच लाखाचे नुकसान

Sumit Tambekar

कोल्हापूर : राधानगरीत सर्वाधिक तर शाहूवाडीत सर्वात कमी लसीकरण

Abhijeet Shinde

इचलकरंजीतील संशयित वृद्धाचा मृत्यू

Abhijeet Shinde

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविणार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कांदा साठ्यावर धाडी टाकणाऱ्यांना सोलून काढा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!