तरुण भारत

चिनी सैन्यांकडून पाच भारतीयांचे अपहरण

ऑनलाईन टीम / इटानगर : 

अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर चिनी सैन्याने पाच भारतीयांचे अपहरण केले आहे, असा दावा अरुणाचल प्रदेशातील काँग्रेसचे आमदार निनाँग एरींग यांनी केला आहे. 

Advertisements

एरींग यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. हे ट्विट त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातील 5 पाच भारतीय नागरिक गायब आहेत. त्यांचे भारत-चीन सीमेवर चिनी सैनिकांकडून अपहरण करण्यात आले आहे. प्रकाश लिंगलिंग नावाच्या व्यक्तीने त्याचा भाऊ प्रसाद रिंगलिंग आणि इतर 4 जणांचे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अपहरण केल्याची बाब समाजमाध्यमांवर मांडली होती. 

तनू बाकार, प्रसाद रिंगलिंग, न्गारू दिरी, डोंगटू ईबिया, तोच सिंगकाम अशी या पाच नागरिकांची नावे आहेत. हे पाचही लोक तागिन समुदायाशी संबंधित आहेत. हे लोक जंगलात शिकार करण्यासाठी गेले असताना त्यांना चिनी सैनिकांकडून ताब्यात घेण्यात आले आहे, असे त्यांच्या कुटुंबियांनी भारतीय लष्कराची भेट घेऊन सांगितले. 

Related Stories

अमेरिकेकडून लष्करी ड्रोन निर्यातीचे निकष शिथिल

datta jadhav

गुजरातच्या मुलीने नोंदविला विक्रम

Patil_p

चीनमधील अमेरिकन उद्योग इंडोनेशियाच्या वाटेवर

datta jadhav

पंतप्रधानांचे ‘समाजमाध्यम’ महिलांच्या हाती

tarunbharat

आता घरीच करता येणार कोरोना चाचणी

datta jadhav

गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटरवरून शुभेच्छा

triratna
error: Content is protected !!