तरुण भारत

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 1.25 लाखांवर

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 1.25 लाखांवर येऊन पोहचली आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 40 लाख 91 हजार 801 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 25 हजार 584 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

शुक्रवारी ब्राझीलमध्ये 45 हजार 691 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 855 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 40.91 लाख कोरोनाबाधितांपैकी 32 लाख 78 हजार 243 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 6 लाख 87 हजार 974 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 63 लाख 89 हजार 057 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 92 हजार 111 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

अफगाणिस्तानात पोहोचली पहिली कमर्शियल फ्लाइट

Patil_p

पोस्टल सर्व्हिस विधेयकावरून अमेरिकेत वाद

Patil_p

आकाशगंगेच्या प्रकाशाचे ध्वनीत रुपांतरण

Patil_p

पुढीलवर्षीही निर्बंध

Patil_p

दक्षिण कोरिया दक्ष

Patil_p

3 पोलीस कर्मचाऱयांची फ्रान्समध्ये हत्या, चौथा गंभीर

Omkar B
error: Content is protected !!