तरुण भारत

गोव्यात कोरोना मृतांची संख्या वाढतेय

गोवा:राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावणार्‍यांचे संख्या वाढत असून काल शुक्रवारी कोरोनामुळे आठ जणांना मृत्यू झाला. गेले चार दिवस मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत आहे. काल नव्याने ५०७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर ३८६ जण कोरोनामुक्त झाले. सध्या रुग्णांची संख्या ४८९६ झाली आहे. येत्या कालावधीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याती शक्यता आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केला आहे. सांखळी, पर्वरी, फोंडा येथील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर अन्य भागातील रग्णसंख्याहि वाढत चालली आहे. सांखळीची रुग्णसंख्या २६९, पर्वरी २७५ , फोंडा ३७८, मडगाव ४४६, वास्को २७१, डिचोली ८८, पेडणे २११, वाळपई १५३, हळदोणा ११८, बेतकी १३४ , कांदोळी ८६, , कासारवर्णे ५५, कोलवाळ १४६ , खोर्ली १४५ , चिबल १५५ , शिवोली १२७, मये ८३ , पणजी २४३, म्हापसा २१८, कुडचडे १३0, काणकोण ११७ ,बांळी १o४, कासावली १२२ चिचिणी ४0, कुठ्ठाळी ११८ , कुडतरी ८३, लोटली ८८ , मडकई ४६ , केपे ११४, सांगे ६0, शिरोडा ९0, धारबांदोडा ७९ तर नावेलीतील १o२ रुग्ण संख्या झाली आहे.

Related Stories

पाच महिन्यांनंतर उद्या खुलणार सीमा

Patil_p

आरोपीला अटक, 1.30 लाखांचा गांजा जप्त

Amit Kulkarni

आता जनतेनेच परिवर्तन घडवून आणावे

Omkar B

लसीकरणाचे ’ड्राय रन’ यशस्वी

Patil_p

पेडणेची प्रसिद्ध पुनव आज

Amit Kulkarni

गोव्याच्या राजकारणाची सूत्र भूमाफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफियांच्या हातात – संजय राऊत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!