तरुण भारत

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 1251 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. आज दिवसभरात 1251 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 42 हजार 241 वर पोहोचली आहे.  

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, आज मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 739 आणि काश्मीर मधील 512 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 9 हजार 547 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 3975 आणि काश्मीरमधील 557

 
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 31 हजार 924 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 7084 रुग्ण जम्मूतील तर 24840 जण काश्मीरमधील आहेत. 


तर आतापर्यंत 770 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 91 जण तर काश्मीरमधील 679 जणांनी आपला जीव गमावला आहे. 


आतापर्यंत 4 लाख 76 हजार 330 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 43 हजार 668 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 9 हजार 547 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत. 

Related Stories

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी श्रीनिवास रेड्डी यांना अटक

Rohan_P

‘आरोग्य सेतू’वर लसीकरणाचा स्टेटस अपडेट करता येणार

Patil_p

कोरोनाचा नवा अवतार भारतात अद्याप नाही

Patil_p

समीर वानखेंडेंनी प्रभाकर साईलच्या आरोपांचे केले खंडन, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Abhijeet Shinde

भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट

Amit Kulkarni

सीन्सीस टेकने दिला उत्तम परतावा

Patil_p
error: Content is protected !!