तरुण भारत

टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी अनिल जैन यांची निवड निश्चित

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजपाचे राज्य सभेतील सदस्य अनिल जैन यांची अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. त्याचप्रमाणे अनिल धुपार यांची संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात येणार आहे.

Advertisements

रविवारी अखिल भारतीय टेनिस संघटनेचे वार्षिक सर्वसाधारण बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत अनिल जैन यांच्या अध्यक्षपदावर अधिकृत शिक्कामोर्तब केला जाईल. अखिल भारतीय टेनिस संघटनेचे यापूर्वी प्रवीण महाजन हे अध्यक्ष होते. आता त्यांच्या जागी अनिल जैन यांची निवड केली जाणार आहे. अनिल जैन हे उत्तरप्रदेशमधून राज्यसभेवर भाजपा सत्ताधारी पक्षातून सदस्य म्हणून निवडले गेले आहेत तर धुपार हे मध्यप्रदेश टेनिस संघटनेचे सचिव आहेत. अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या सरचिटणीसपदी यापूर्वी एच. चटर्जी यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांच्या जागी धुपार यांची निवड केली जाणार आहे. रविवारी होणाऱया संघटनेच्या बैठकीमध्ये चार संयुक्त सचिवांची निवड केली जाणार आहे.

Related Stories

पाटणा पायरेट्स यू मुम्बाला धक्का

Patil_p

पिस्तूलमध्ये बिघाड झाल्याने मनू भाकरच्या पदरी निराशा

Patil_p

नवल टाटा हॉकी अकादमीला माजी हॉकीपटूंची भेट

Patil_p

जयपूरमध्ये होणार जगातले तिसरे मोठे क्रिकेटचे मैदान

datta jadhav

मियामी टेनिस स्पर्धेत बार्टी विजेती

Patil_p

पाकचा बांगलादेशवर मालिका विजय

Patil_p
error: Content is protected !!