तरुण भारत

दररोज शाकाहारी जेवणाबरोबरच योगाभ्यास

कोरोनाबाधित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दिनचर्येमध्ये बदल

पणजी/ प्रतिनिधी

सध्या कोरोनामुळे आजारी असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दिनचर्यमध्ये देखील मोठा बदल झाला आहे दररोज शाकाहारी जेवणाबरोबरच योगा अभ्यास देखील त्यांचा चालू झाला आहे. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन कामामध्ये मात्र त्यांनी कोणताही बदल केलेला नाही.

मुख्यमंत्री गेले दोन दिवस कोरोनाबाधित झाले असून ते येथील सरकारी बंगल्यावर निवास करीत आहेत. बंगल्याच्या वरच्या मजल्यावर ते राहत असून तळमजल्यावर काही अधिकारीवर्ग व कर्मचारीवर्ग काम करीत आहेत. वरच्या मजल्यावर कोणीही जात नाही. प्रज्योत गिरोडकर हे त्यांना सहकार्य करीत आहेत त्यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. मुख्यमंत्री दिवसभर फाइल्स तपासणीचे काम करतात तसेच विविध अधिकाऱयांशी चर्चा करणे तेदेखील सर्व फोनवरती काम चालते. आपला कुटुंबाशी संपर्क हा देखील आता भ्रमणध्वनीवर चालतो, असे त्यांनी सहजपणे सांगितले.

सकाळी पावणेसात दरम्यान उठतात

मुख्यमंत्र्यांचा दिनक्रम आता बदलत चालला असून ते पहाटे ऐवजी सकाळी पावणेसातच्या दरम्यान उठतात. त्यानंतर गरम पाणी घेऊन ते योगासना तसेच योगा अभ्यास करत असतात त्यानंतर विविध वृत्तपत्रांचे वाचन, न्याहारी आणि त्यानंतर सर्व फाईल करून निर्जंतुकीकरण करून नंतर त्या तपासणीसाठी घेतल्या जातात व परत अधिकाऱयाकडे पाठवतात त्या पुन्हा एकदा निर्जंतुकीकरण करून ठेवलेल्या असतात दुपारी आपण थोडी वामकुक्षी करतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा फाईल्सच्या तपासणी तसेच अनेक वरि÷ अधिकाऱयांशी आपण चर्चा करतो काही महत्त्वाचे निर्णय फोनवरती सांगितले जातात आणि त्यानंतर रात्री उशिरा आपण झोपायला जातो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांबरोबरच त्यांचे साहाय्यक, कार्यालयातील अनेक कर्मचारी तसेच अधिकारी देखील कोरोनाबाधित झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे साहाय्यक अधिकारी उपेंद्र जोशी तसेच गौरीश कलंगुटकर, प्रज्योत गिरोडकर यांनादेखील कोरोनाची बाधा झाली आहे. मुख्यमंत्र्यानी स्वत:ला घरीच कोंडून घेतले आहे. या ठिकाणी कोणालाही पाठविले जात नाही.

आपली कंबर अचानक दुखू लागली व त्यानंतर अंग किंचित गरम झाले असता चालकाला ताप आल्याचे कळले. मात्र त्याच अहवाल नकारात्मक आला व आपला अहवाल सकारात्मक आला. आता आपल्याला कोणताही त्रास होत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

म्हादई अभयारण्यात वाघाचा संशयास्पद मृत्यू

Patil_p

वास्को-पाटणा रेल्वे मार्गावर उद्यापासून ‘हमसफर एक्स्प्रेस’

omkar B

दै.तरुण भारतचा 11 रोजी पणजीत वर्धापनदिन सोहळा

Patil_p

द. गोवा जिल्हा इस्पितळात कोविड इस्पितळ सुरू

Patil_p

मांद्रे व हरमल येथे अमलीपदार्थ जप्त

omkar B

मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याच्या अफवेने पळापळ.

tarunbharat
error: Content is protected !!