तरुण भारत

खानापूर तालुक्यात शनिवारी सापडले 26 कोरोनाबाधित

आणखी एका कोरोनाबाधिताचा बळी

प्रतिनिधी / खानापूर

Advertisements

खानापूर तालुक्यात कोरोना व्हायरसची परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट बनत चालली आहे. शनिवारी सकाळी आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार आणखी 27 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामध्ये खानापूर शहरात 7, हलकर्णी 5, शिवाजीनगर 4 व तालुक्याच्या विविध भागात  10 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी गर्लगुंजी येथील 57 वर्षीय कोरोनाबाधिताला उपचारासाठी बेळगावच्या बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्या कोरोनाबाधिताचे निधन झाले. यामुळे तालुक्यात कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या आता 11 झाली आहे. शनिवारी सापडलेल्या कोरोनाबाधितांमध्ये चिरमुरकर गल्ली येथे 52 वर्षीय महिला तर 19 व 77 वर्षीय पुरुष, स्टेशनरोड जवळील 51 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. दुर्गानगर येथील 46 वर्षीय पुरुष तर केएसआरपी रोड येथील 39 वर्षीय महिलेचा समावेश आहे.  केंचापूर गल्ली येथे 69 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. हलकर्णी येथे सापडलेल्या कोरोनाबाधितांमध्ये 60, 30 व 85 वर्षीय महिला तर 30, 34 वर्षीय पुरुषांसह 2 वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा झाली आहे. शिवाजीनगर येथे 40 वर्षीय महिला, 49 वर्षीय पुरुष, 5 वर्षीय बालिका तर 11 वर्षीय बालकाचा समावेश आहे. याशिवाय तालुक्यातील इतरही गावांमध्ये कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामध्ये बांदेकरवाडा येथे 23 वर्षीय महिला, प्रभूनगर येथे 25 व 29 वर्षीय पुरुष, गांधीनगर येथे 28 वर्षीय पुरुष, माचाळी-लोंढा येथे 26 वर्षीय महिला तर राई गल्ली लोंढा येथील 41 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. खैरवाड येथे 25 वर्षीय महिला, हडलगा येथे 23 वर्षीय महिला तर के. के. कोप्प येथे 50 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे आता तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 393 इतकी झाली आहे. 

Related Stories

म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा

Amit Kulkarni

23 हजार विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण

Amit Kulkarni

शिवपुतळय़ावरून सहय़ाद्रीनगर येथे वादंग

Omkar B

हंडीभडंगनाथ मठाच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू

Amit Kulkarni

निम्म्या कामगारांवरच सुरू आहे उद्योगांची धडधड

Patil_p

पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी जिल्हय़ात 17 कोटीची तरतूद

Patil_p
error: Content is protected !!