तरुण भारत

देशात एका दिवसात वाढले 90 हजार कोरोना रुग्ण; एकूण रूग्णसंख्या 41 लाखांवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात विक्रमी कोरोना रुग्णवाढ झाली. शनिवारी दिवसभरात 90 हजार 633 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1065 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या  41 लाख 13 हजार 812 वर पोहचली आहे. मृतांचा एकूण आकडा 70 हजार 626 एवढा आहे. 

Advertisements

सध्या देशात 8 लाख 62 हजार 320 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 31 लाख 80 हजार 866 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशात आतापर्यंत 4 कोटी 88 लाख 31 हजार 145 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 92 हजार 654 रुग्णांची तपासणी शनिवारी एका दिवसात करण्यात आली.

Related Stories

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन

prashant_c

भारतात 2 कोटी नोकरदारांना फटका

Patil_p

देशात मागील 24 तासात 83,809 नवे कोरोना रुग्ण; 1054 मृत्यू

datta jadhav

आणखी एका आमदाराने सोडली TMC ची साथ

datta jadhav

तिरुपति विमानतळावर वाद, चंद्राबाबू ताब्यात

Patil_p

जम्मू काश्मीर : कोरोनाबाधितांनी ओलांडला 96 हजारांचा टप्पा

pradnya p
error: Content is protected !!