तरुण भारत

उत्तरप्रदेशातील मिर्ची गँगच्या म्होरक्याला मुंबईत अटक

ऑनलाईन टीम / मुंबई : 

उत्तरप्रदेशातील भाजप नेता आणि नोएडा येथील व्यवसायिकाची हत्या करून मागील एक वर्षांपासून फरार असलेल्या मिर्ची गँगच्या म्होरक्याला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने विलेपार्ले येथून अटक केली. 

आशु उर्फ आकाश सिंग (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पुढील तपासासाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश सिंग हा उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवाशी आहे. त्याने स्वतःची मिर्ची गँग सुरू केली होती. मागील वर्षी भाजप नेते राकेश शर्मा यांची त्याने गोळ्या झाडून हत्या केली होती. तसेच आठ महिन्यांपूर्वी त्याने नोएडातील प्रसिद्ध उद्योगपती गौरव चांडेल (45) यांचीही गोळ्या घालून हत्या केली होती. तेव्हापासून तो फरार होता. 

तपासादरम्यान, उत्तरप्रदेश पोलिसांना आकाश सिंग मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुंबई पोलिसांना तो विलेपार्ले पश्‍चिम येथील इर्ला मार्केटजवळील आलुवाडी येथे राहत असल्याचे समजले. ओळख पटू नये म्हणून त्याने दाढी वाढवली होती व तेथेच तो भाजीविक्रीचा व्यवसाय करत होता. त्याच्यावर 19 गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याच्या अटकेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडीच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. 

Related Stories

शरद पवारांनी कोरोना लसीचा घेतला दुसरा डोस ; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

triratna

पुलवामात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त

Amit Kulkarni

उत्तराखंड : 791 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p

गुपचूप तुरुंगाबाहेर आला होता राम रहिम

Patil_p

तृणमूल काँग्रेसने ‘शताब्दी’ रोखली

Patil_p
error: Content is protected !!