तरुण भारत

अजूनीमध्ये परग्रहावरील माणसाची गोष्ट

मराठी चित्रपटात विविध विषय हाताळण्यात येत असले तरी सायफाय चित्रपटांची उणीव आहे. मात्र परग्रहवासी ची गोष्ट अजूनी या चित्रपटातून उलगडणार आहे. त्यामुळे सायफाय कथानक उणीव आता अजूनी हा चित्रपट भरून काढणार आहे.

संघर्षयात्रा, शिव्या असे उत्तम चित्रपट केलेला दिग्दर्शक साकार राऊत एक अनोखी कथा अजूनी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठय़ा पडद्यावर सादर करत आहेत. अर्थ स्टुडिओज आणि सारा मोशन पिक्चर्स यांनी ष्अजूनीष् या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. पीयूष रानडे, प्रणव रावराणे, श्वेता वेंगुर्लेकर, प्रतीक देशमुख यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. साकार राऊत यांच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा अजूनी हा चित्रपट खूपच वेगळा ठरणार आहे. चित्रपटाचा विषय आणि कथानक अतिशय वेगळं असल्याचं, सायफाय कथानकाला प्रेमाचा पदर असल्याचं टीजरमधून दिसून येत आहे. या चित्रपटात परग्रहवासीची भूमिका कोणी साकारलीय? हे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र या चित्रपटाविषयी आता अधिक कुतूहल निर्माण झालं आहे.

Related Stories

येरे येरे पावसा चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव

Patil_p

कोल्हापुरी कलेचा फिल्मफेअरने सन्मान

triratna

बजरंगी भाईजानच्या ‘मुन्नी’ला आठवतेय शाळा

Amit Kulkarni

…म्हणून मुंबईतील खटले हिमाचलला हलवा; कंगनाची याचिका

pradnya p

ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी लवेंडर फार्म

Amit Kulkarni

चित्रपट निर्माते हरीश शहा यांचे निधन

pradnya p
error: Content is protected !!