तरुण भारत

सांगली जिल्हय़ात 34 जणांचा मृत्यू, नवे 763 रूग्ण

मनपा क्षेत्रात 337 वाढलेः ग्रामीण भागात 426 रूग्ण वाढलेः आजअखेर 660 जणांचा मृत्यू

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

रविवारी जिल्हय़ात नवीन 763 रूग्ण वाढले आहेत. तर 363 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 34 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 27 आणि परजिल्हय़ातील सात जणांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 660 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.

महापालिका क्षेत्रात 337 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात रविवारी नवीन 337 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 193 तर मिरज शहरात 144 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर तेरा हजारापेक्षा अधिक रूग्णांची ऍण्टीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 35 ते 40 टक्के लोक बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्या मोठयाप्रमाणात वाढत चालली आहे. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या आठ हजार 403 झाली आहे.

ग्रामीण भागात 426 रूग्ण वाढले

 ग्रामीण भागातही कोरोनाने गेल्या आठ दिवसापासून हाहाकार सुरूच ठेवला आहे. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे.  नवीन 426 रूग्ण  आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 25, जत तालुक्यात 13, कडेगाव तालुक्यात 59 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 27, खानापूर तालुक्यात 30, मिरज तालुक्यात 62 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 48, शिराळा तालुक्यात 33, तासगाव तालुक्यात 43 आणि वाळवा तालुक्यात सर्वाधिक 86 रूग्ण वाढले आहेत.

जिल्हय़ातील 27 जणांचा मृत्यू

जिल्हय़ातील 27 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये  सांगली शहरातील तिघांचा  मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 52 वर्षीय व्यक्तीचा क्रांती कॉर्डिकमध्ये आणि 58 वर्षीय व्यक्तीचा व 52 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान कुल्लोळी हॉस्पिटल येथे  मृत्यू झाला.  मिरज शहरात तिघांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये 47 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात 36 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे आणि 60 वर्षीय व्यक्तीचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. कुपवाड येथील 75 वर्षीय महिलेचा सिव्हील हॉस्पिटल येथे  मृत्यू झाला. अमणापूर येथील दोघांचा मृत्यू झाला. 30 वर्षीय महिला आणि 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. नागठाणे येथील 65 वर्षीय महिला, वाटेगाव येथील 70 वर्षीय व्यक्ती जुनेखेड येथील 60 वर्षीय महिला यांचा साई हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. आष्टा येथील 70 वर्षीय व्यक्ती, हिंगणगाव येथील 54 वर्षीय महिला यांचा कोरोना  रूग्णालय येथे मृत्यू झाला. बुधगाव येथील 49 वर्षीय व्यक्तीचा सांगली सिव्हील येथे मृत्यू झाला.  अंकलखोप येथील 45 वर्षीय व्यक्तीचा प्रकाश हॉस्पिटल येथे. कवठेपिरान येथील 53 वर्षीय व्यक्ती श्वास हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. दुधगाव  येथील 33 वर्षीय व्यक्तीचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. विटा येथील 82  वर्षीय महिलेचा श्री हॉस्पिटल येथे तर 55 वर्षीय व्यक्तीचा ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला. चिकुर्डे येथील 72 वर्षीय महिलेचा साई  हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मणेराजुरी येथील 65 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला. जत येथील 58 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला. पायाप्पाची वाडी येथील 70 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. इस्लामपूर येथील 50 वर्षीय व्यक्तीचा सुश्रुत हॉस्पिटल येथे. तर कवलापूर येथील 56 वर्षीय महिलेचा अदित्य हॉस्पिटल येथे मृत्यू झाला.  या 27 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 660 झाली आहे.

परजिल्हय़ातील सात जणांचा मृत्यू

 परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया सात जणांचा मृत्यू झाला आहे.  कोल्हापूर जिल्हय़ातील जयसिंगपूर येथील 62 वर्षीय व्यक्तीचा कोरोना हॉस्पिटल येथे तसेच 64 वर्षीय व्यक्तीचा आणि कराड येथील 40 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला.  शिरोळ येथील 40 वर्षीय व्यक्तीचा सिव्हील हॉस्पिटल येथे कराड येथील 64 व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटल येथे, पंढरपूर येथील 65 वर्षीय व्यक्तीचा दुदणकर हॉस्पिटल येथे मलकापूर येथील 43 वर्षीय महिलेचा ओम श्री हॉस्पिटल येथे  मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हय़ातील 122 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.

जिल्हय़ासाठी नवीन 74 व्हेंटिलेटर

जिल्हय़ासाठी ठाणे आणि धुळे येथून प्रत्येकी 10 तर वर्धा येथून 15 व्हेंटिलेटर आले आहेत. तसेच मुंबई महापालिका यांच्याकडून 10, पीएम केअरमधून 25, बेंगलोर नारायण हॉस्पिटल येथून एक आणि टाटा ट्रस्टकडून तीन अशी एकूण 74 नवीन व्हेंटिलेटर सांगली जिल्हय़ाला प्राप्त झाले आहेत. ही 74 व्हेंटिलेटर जिल्हय़ातील विविध रूग्णालयांना तातडीने देण्यात आली आहेत. त्यामुळे 74 नवीन व्हेंटिलेटर बेड तयार झाले आहेत.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती

एकूण रूग्ण    17025

बरे झालेले     9065

उपचारात      7300

मयत          660

Related Stories

राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांना मातृशोक

Abhijeet Shinde

सांगली : शिराळा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

Abhijeet Shinde

राऊत खातात ‘मातोश्री’चे, गोडवे गातात ‘गोविंदबागे’चे

Abhijeet Shinde

मिरजेत निवृत्त शिक्षकाचा बंगला फोडला, १९ तोळे दागिने लंपास

Abhijeet Shinde

जत पालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकात बाचाबाची

Abhijeet Shinde

‘सांगलीत आण्णाभाऊ साठेंचे भव्य स्मारक होणार’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!